कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा वर्षाव.

- Advertisement -

Kolhapur Muncipal Corporation Election: कोल्हापूर जिल्ह्यात काही महिन्यांच्या कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका या राजकीय वातावरणाला चांगलाच रंग देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात येणारे वर्ष निवडणुकांच्या राजकीय गदारोळाचे असेल, हे निश्चित आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या या दोन्ही पक्षांना मतदारांनी एकही जागा दिलेली नाही. विधानसभेच्या सर्व १० ही जागांवर महायुतीचे आमदार विजयी झाले आहेत. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकीत नव्या आमदारांचा कस लागणार आहे. शहरे आणि तालुक्यावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता आणणे हे त्यांच्यासाठी, तर आमदारांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांना ही संधी आहे. जिल्ह्यात आता 463 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. सर्वसाधारणपणे मोठी गावे सोडली, तर स्थानिक नेते या निवडणुकीत लक्ष घालत नाहीत. स्थानिक विकास आघाड्या यामध्ये सक्रिय असतात. गावपातळीवर त्याचे नियोजन केले जाते.

जिल्ह्यात सहकारी बँका आणि गोकुळ निवडणुका महत्त्वाच्या ठरणार:

गोकुळ आणि जिल्हा बँक बलाढ्य आर्थिक गड़ असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक २०२१ मध्ये जानेवारी व मे मध्ये झाली होती. या निवडणुका २०२६ मध्ये होणार असल्या तरी त्याच्या मतदानकरिता ठराव दाखल याचवर्षी करावे लागणार असल्यामुळे त्या निवडणुकांचे रिंगणही नव्या वर्षात सुरू होणार आहे.

या निवडणुकांमधून केवळ राजकीय सत्ता निश्चित होणार नाही, तर जिल्ह्यातील विकासाचे दिशा ठरणार आहे. मतदारांनी यावेळी जागरूक राहून योग्य निवड करण्याची गरज आहे. राजकीय रणसंग्रामाला सज्ज झालेला कोल्हापूर जिल्हा नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहणार, हे निश्चित आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles