बीड- कोरोनाच्या काळात धक्कादायक घटना घडत आहेत. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने २४ रुग्णांना आपली जीव गमवावा लागला, विरार मध्ये आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. भांडुप, नाशिक इथे ही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच काल मध्य रात्री बीडच्या सिविल रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला.
ऑक्सिजन बंद केल्याने तेथील दोन रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. रात्री 12.30 वाजता वॉर्ड क्रमांक 7 मधील ऑक्सिजन बंद पडला. यावेळी त्या हॉस्पिटल मध्ये कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते, असे रूग्णांच्या नातेवाइकांनी संगितले.
रात्री 1 वाजता डॉक्टर आले आणि त्यांनी ऑक्सिजन सुरू केला पण तोपर्यंत दोघांचे मृत्यू झालेले होते. डॉक्टरांकडे जाब विचारले असता ते बोलले की कोणीतरी ऑक्सिजन हॅंडल फिरवला म्हणून बंद पडले,अस सांगून त्यांनी यातून स्वतालाच क्लीन चिट दिली.