कोल्हापूर शहरात मतदान केंद्र निहाय लसीकरण केंद्र सुरू करून आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मागणी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा व बेड्सची कमतरता भासण्याची तीव्र शक्यता आहे. गतवर्षीचा अनुभव विचारात घेता प्रशासनाने कोरोना प्रतिबंध उपयायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर महापालिकेच्या विविध 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातून लसीकरण केले जात आहे. कोरोणा चा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत असल्याने त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी लसीकरणासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडे एक ते दीड हजार लससाठा उपलब्ध होत असल्याने बहुतांश नागरिकांना लसीकरणा अभावी परतावे लागत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता एक मे पासून लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन होण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवणे आवश्यक आहे. याकरता कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने व्यापक लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर शहरात मतदान केंद्र निहाय लसीकरण केंद्र सुरू करण्यात याावे. जेणेकरून नागरिकांचा त्रास कमी होऊन व्यापक लसीकरण होऊन कोरोणाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे. असेेही राजेश क्षीरसाागर यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.