मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. मुंबईतील मालाड (Malad) पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका (BMC) आणि घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे.(mumbai Malad Building Collapsed)
स्थानिकांच्या मते, ही संपूर्ण दुर्घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात 7 जण राहत होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.(mumbai Malad Building Collapsed)
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली.(mumbai Malad Building Collapsed)