मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप जाहीर

- Advertisement -

देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.Mass Communication course

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए / एमए अभ्यासक्रमांमध्ये किंवा एमबीए (मार्केटिंग) (मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेत पदवी घेतली आहे) चे शिक्षण घेत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून उपरोक्त अभ्यासक्रमांमध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे ते मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद अटींच्या अधीन पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा असेल.

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 10,000/- रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.Mass Communication course

इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणारे फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि इतर तपशील पुढील लिंकवर पाहू शकतात: https://jalshakti-dowr.gov.in/document/notice-for-internship-of- mass-communication-last-date-15-sep-2023/

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles