Thursday, November 21, 2024

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रचला इतिहास.

- Advertisement -

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या पदरात तिसरे पदक आले. महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी येथे राहणारा स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale Shooter) इतिहास रचला आहे. १ ऑगस्ट रोजी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक मिळवून महाराष्ट्रासह जग जिंकलं. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात प्रथमच भारतीय नेमबाजाने पदक जिंकले अवघ्या काही गुणांनी रौप्य पदक हुकला. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने 463.6 गुण घेवून सुवर्णपदक जिंकलं. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक मिळवला. 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 12 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale Shooter) ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.

परिचय स्वप्नील कुसाळे

स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale Shooter) कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावात राहणारा आहे. त्याचा जन्म 6 ऑगस्ट 1995 मध्ये झाला. स्वप्नीलने अखेर पॅरिसच्या धरतीवर आपली चमक दाखवली. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने 12वीच्या परिक्षेकडे लक्ष्य दिले न्हवते. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. त्यानंतर त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

धोनीला मानतो आपला आदर्श स्वप्नील कुसाळे

 

ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale Shooter) हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. स्वप्नील कुसाळे हा महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे असे स्वप्नीलचे म्हणणे आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो, तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles