Friday, November 22, 2024

भारताच्या पदरात रौप्य आणि कांस्य पदकाची गवसणी.

- Advertisement -

अवघ्या भारताचे लक्ष वेधून घेणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 (paris olympics 2024) स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवलं तर हॉकी टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. नीरज चोप्राने (niraj chopra) भालाफेकीत सलग दुसरं पदक मिळवून दिलं. आत्तापर्यंत भारताने पाच पदक मिळवले आहेत, यामध्ये तीन पदक शूटिंगमधून १ पदक हॉकीमधून आणि १ पदक भालाफेकमधून आले आहे.

नीरज चोप्राचे रौप्य पदकावर शिक्कामोर्तब :

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (niraj chopra) टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये ज्याप्रकारे कामगिरी केली होती तेव्हा भारतीयांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता आणि त्याला भरभरून प्रेम दिले होते. नीरज चोप्रा ट्रक ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय ठरला होता. त्याचप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत रौप्य पदकाला गवसणी घातली. नीरजचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 (paris olympics 2024) स्पर्धेत अवघ्या काही गुणांनी सुवर्णपदक हुकले. या स्पर्धेत नीरज चोप्राने (niraj chopra) दुसऱ्या प्रयत्नात 89.45 भाला फेकत ऐतिहासिक रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या फेरीपासूनच पाकिस्तानचे अर्शद नदीमने हाय स्कोरिंग खेळ दाखवून 92.97 मीटर भाला फेकून नव्या ऑलिम्पिक विक्रमासह  सुवर्ण पदक जिंकले. तर ग्रेनेडाचा पीटर्स 88.54 मीटर्स थ्रोसह कांस्य पदक मिळवला.

हॉकी टीमने कांस्य पदक पटकवले – चक दे इंडिया

हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात हॉकी टीम इंडियाने (hockey team india olympics) स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केली. भारत आणि स्पेन यांच्यातील हॉकी सामन्याचे पहिले सत्र चांगलेच रंगले स्पेनचा संघ हा यावेळी जोरदार आक्रमण करत होता. स्पेनने सामन्याच्या 18 व्या मिनिटाला गोल केला होता त्यामुळे त्यांनी  1-0 अशी आघाडी घेतली होती पण भारताने ही हार मानले नाही दुसरा सत्र संपायला फक्त 48 सेकंद शिल्लक असताना भारताने पेनेल्टी कॉर्नर वर गोल केला आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. भारताने त्यानंतर पेनेल्टी कॉर्नरवर 33 व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल केला आणि भारताने 2-1 अशी आघाडी घेतली ही आघाडी भारताने तिसऱ्या सत्रात कायम ठेवली त्यामुळे भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये (paris olympics 2024) 2-1 अशी आघाडी घेत भारताने दमदार विजय साकारत कांस्यपदक जिंकले.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles