Hariyana & Jammu-Kashmir Election Result: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर या दोन राज्यांतील जनता कोणाला सत्तेवर आणते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर (Hariyana & Jammu-Kashmir) विधानसभेचा अनपेक्षित निकाल लागला आहे.
एक्झिट पोल्सचे अंदाज आणि राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष पाहून यावेळी हरियाणात काँग्रेस पक्ष सत्तेत येणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. बहुतांश एक्झिट पोल्सनी हरियाणात काँग्रेस सत्तेत येणार असल्याचे अंदाज दर्शिवले होते. परंतु याउलट हरियाणा आणि जम्मू-काश्मीर (Hariyana & Jammu-Kashmir) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे भाजपाने सलग तिसऱ्यांना हरियाणात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून सत्ता स्थापन करणार आहे.
हरियाणा विधानसभा निवडणूक निकाल :
एकूण जागा- 90
भाजप- 48
काँग्रेस- 37
इंडियन नॅशनल लोक दल-2
अपक्ष-3
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकाल :
एकूण जागा- 90
नॅशनल कॉन्फरन्स- 42
भाजप- 29
काँग्रेस- 06
पीडीपी-03
पीपल कॉन्फरन्स- 01
भारतीय कम्युनिस्ट पार्टी- 01
या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेते रिंगणात उभे होते. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मोठा विजय मिळवला आहे, तर हरियाणामध्ये भाजपने प्रभावी प्रदर्शन केले. त्यामुळे येणाऱ्या काळात या राज्यांमध्ये राजकीय परिस्थिती कशी बदलते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हरियाणात जो निकाल लागला तोच पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात लागणार आहे. हरियाणाने विजयाची पहिली सलामी दिली आहे. तर, दुसरी सलामी महाराष्ट्र देणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.