Tuesday, October 15, 2024

कागल विधानसभेत महायुतीचा पेच वाढला, विरेंद्र मंडलिक इच्छुक |

- Advertisement -

Kagal Assembly Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागले आहे. कागल विधानसभेत (Kagal Assembly) महायुतीला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे. समरजित घाटगे (Samarjeet Ghatge) हे शरदचंद्र पवार गटात गेले त्यानंतर आता संजय मंडलिक यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक हे कागल विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत आमच्याबद्दल विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनी चुकीचे नरेटीव्ह सेट केला. हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) देखील शाहू महाराजांना मतदान केलं तर चालेल असा संदेश दिला. तिकीट मिळाल्यानंतर मंडलिक यांच्या विरोधात वातावरण आहे, असे वातावरण मतदारसंघात तयार करण्यात आले आणि तुमच्या या वागण्यामुळे आम्हाला फटका बसला, असा आरोप माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ आता जरा थांबा : विरेंद्र मंडलिक

मुश्रीफ साहेब कागल विधानसभेत तुमच्या विरोधात नकारात्मक वातावरण आहे. जिल्ह्यात दहापैकी आठजण नव्या चेहऱ्याची मागणी करत आहेत. आता कागल विधानसभेत महायुतीचा चेहरा मी आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ साहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा करावी व मंडलिक साहेबांच्या उपकाराची परतफेड करावी, अशी मागणी संजय मंडलिक यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) हे शिवसेना पदाधिकारी नियुक्ती मेळाव्यात बोलत होते.

आतापर्यंत मुश्रीफ पाच वेळा आमदार आणि पाच वेळा मंत्री झाले आहेत. आता हसन मुश्रीफ यांनी थांबावे आणि मला उमेदवारी मिळावी आता आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे, असे म्हणत विरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) यांनी कागल मधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारीसाठी विरोध केला आहे.

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला. यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शांत असलेला मंडलिक गट आता पुन्हा विधानसभेच्या तोंडावर अॅक्टिव झाला असून आज कागल विधानसभा मतदारसंघातील शेंडूर येथे मेळावा पार पडला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि समरजीत घाटगे यांच्यावर विरेंद्र मंडलिक यांनी तोफ डागली. हा मेळावा झलक आहे पण कुणाला पिक्चर बघायचा आहे तो देखील दाखवू, असे सांगत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खुले आव्हान दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles