मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; मोठी बातमी

- Advertisement -

आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका अतिशय महत्वाच्या आणि लोकप्रिय योजनेबद्दल बोलणार आहोत – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (mukhyamantri majhi ladki bahin yojana). ही योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे सरकार देत आहे.

योजना काय आहे? | ladaki bahin yojana

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही महाराष्ट्र सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य पुरवले जाते. या योजनेचे मुख्य उद्देश्य महिलांच्या आर्थिक स्थिती सुधारणे, त्यांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे आणि कुटुंबात त्यांची भूमिका मजबूत करणे हा आहे.

लाडकी बहीण योजना पात्रता | Ladki bahin Yojana Eligibility

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • १. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • २. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • ३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • ४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • ५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजना अपात्रता | Ladki bahin Scheme Ineligibility

  • १. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

लाडकी बहीण योजनेचे फायदे | ladki bahin yojana benefits

  • आर्थिक सहाय्य: महिलांना दरमहा निश्चित रक्कम दिली जाते, ज्यामुळे त्यांच्या घरात आर्थिक स्थिरता येते.
  • स्वावलंबन: या योजनेमुळे महिला स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण स्वतः करू शकतात.
  • समाजात महिलांची प्रतिमा: ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या समाजातील प्रतिमेत सुधारणा करते.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? | How to apply for Ladki bahin Yojana? |

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

  • १. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • २. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • १. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे
  • २. अधिवास प्रमाणपत्रप्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
  • ३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
  • ४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
  • अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
  • ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • ५. नवविवाहितेच्या बाबतीतरेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
  • ६. बँक खाते तपशील(खाते आधार लिंक असावे)
  • ७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

महत्त्वाची माहिती

  • योजनेची अधिकृत वेबसाइट: या योजनेची अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपण सर्व आवश्यक माहिती मिळवू शकता.
  • सहाय्य: जर आपल्याला या योजनेबद्दल कोणतीही शंका असल्यास, आपण संबंधित कार्यालयात संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles