10वी ,12वी च्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा – राज ठाकरे

- Advertisement -

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेक करोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला,’ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.

‘मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि करोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही,’ असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी,’ अशी मागणीही राज ठाकरेंनी केली आहे.

व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles