देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यावर विरोधी पक्षाने केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत दिला आहे. (Avoiding political criticism, everyone has to fight this fight together – Rohit Pawar)
“कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं! आणि कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!” असे रोहित पवार यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.