Breaking News| महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस- राज्य सरकारचा निर्णय

Live Janmat

मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राज्य सरकारच्या तिजोरीतून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वस्त दरात आणि चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली.

केंद्रसरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे.

https://twitter.com/MumbaiNCP/status/1386253279055597574?s=19

कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे.मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी होकार दिला होता. अशी माहिती त्यांनी ट्विटरवर द्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here