Monday, September 9, 2024

सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी : धनंजय महाडिक

- Advertisement -

नवी दिल्लीत संसदेचे (Parliament) अधिवेशन सुरू आहे. कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Rajya Sabha MP Dhananjay Mahadik) यांनी राज्यसभेत बोलताना महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात 11000 पेक्षा जास्त सार्वजनिक ग्रंथालय आहेत. लाखो वाचकांना उत्तम प्रकारचे  पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रे सार्वजनिक ग्रंथालयातून वाचकांसाठी  मोफत उपलब्ध होतात. अशाप्रकारच्या ग्रंथालयांना राज्य सरकार वार्षिक देखभाल अनुभव अनुदान देते पण आता बदलत्या डिजिटल युगामध्ये नव्या पिढीची वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी या ग्रंथालयामध्ये डिजिटल पायाभूत सुविधा आणि ई पुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असा मुद्दा खासदार धनंजय महाडिक (Rajya Sabha MP Dhananjay Mahadik) यांनी संसदेत (Parliament) मांडला या मुद्द्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.


महाराष्ट्र सरकारने 469.38 कोटी रुपयांच्या विशेष मदतीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु केंद्र सरकारने हा प्रस्ताव नाकारला असून हा प्रस्ताव ग्रामपंचायत आणि नगरपालिका भागात नवीन ग्रंथालय उभारण्यासाठी मदत दिली जात असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकारचा हा प्रस्ताव सुमारे 11 हजार 332 सार्वजनिक वाचनालयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ही वाचनालय गेल्या अनेक वर्षापासून वाचकांना उत्तम सेवा देत आहे.  सध्या जी ग्रंथालये आहेत त्या ग्रंथालयांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Rajya Sabha MP Dhananjay Mahadik) यांनी केली. राज्यातील वाचन चळवळ अधिक समृद्ध होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles