लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वचननामा|

लाडक्या बहिणींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojna) सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी महायुतीने ही योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेला अनेक विरोधक विरोध करत आहेत. त्यामुळे तुमच्या योजनेत खोडा घालणाऱ्यांना आपण कोल्हापरी जोडा नक्की दाखवाल असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) किंवा सर्वसामान्यांसाठी मी 100 वेळा तुरुंगात जायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) कोल्हापुरातून महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे. ही सभा खूप ऐतिहासिक आहे कारण 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. येणाऱ्या 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला आम्ही परत येऊ अशी ग्वाही देऊन एकनाथ शिंदेंनी दहा कलमी वचननाम्याची घोषणा केली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली, तसेच आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, असेही एकनाथ शिंदें म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील केलेल्या 10 घोषणा :

1) लाडक्या बहिणींना 2100 रु.प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांवरुन 2100 रु. देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन.

2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रु. प्रत्येक वर्षाला 12,000 रुपयांवरुन 15,000 रु. देण्याचे तसेच एमएसपीवर 20% अनुदान देण्याचे वचन.

3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन.

4) वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रु.महिन्याला (1500 रु.वरुन 2100 रु.देण्याचे वचन)

5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन.

6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन.

7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन.

8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन.

9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन.

10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com