Friday, October 4, 2024

गडहिंग्लज-कोल्हापूर धावत्या बसमध्ये जावयाचा खून, सासू-सासर्‍याला अटक|

- Advertisement -

Gadhinglaj to kolhapur bus murder: गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटी बसमध्ये एक मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत संदीप रामगोंडा शिरगावे (वय 35, चिंचवड शिरोळ) याचा खून सासू-सासऱ्याने केल्याचा आरोप आहे. दि. २५ सप्टेंबर बुधवारी रात्री दहा वाजता संदीपचा मृतदेह कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर टाकण्यात आला.

दारू पिऊन मुलीला वारंवार मारहाण करणाऱ्या जावायाला सासू-सासऱ्याने धावत्या बसमध्ये कागलजवळ दोरीने गळा आवळून खून केला. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात दुकानाच्या पायरीवर मृतदेह टाकून सासू-सासरे मध्यरात्री पुन्हा गडहिंग्लजला गेले. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व शाहुपुरी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन अवघ्या चार तासात आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संदीपचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत सापडलेला संदीपचा मृतदेह तपासल्यावर त्याच्या खिशात एक डायरी आणि किल्ली सापडली. त्यात मृताचा आणि त्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मिळाला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून मृत संदीपच्या सासू-सासऱ्याची ओळख पटवली. सासरा हणमंताप्पा काळे आणि सासू गौरव्वा काळे यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही मृतदेह टाकून गडिंग्लज येथे परतले होते. या प्रकरणात पोलिसांनी संशयितांचे फुटेज घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. सदर घटनेची अधिक तपासणी सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles