Friday, October 4, 2024

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा पेच वाढला भाजपला धक्का बसण्याची शक्यता ?

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा फटका बसणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या हालचालीने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत राजीनामा दिला. त्यानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे (Sanarjeet ghatge) यांनी देखील तुतारी हातात घेवून भाजपची साथ सोडली.

जिल्ह्यात राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मतदारसंघाचा आढावा घेवून उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. जिल्ह्यात भाजपचा सध्या एकही आमदार नाही. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे राज्यसभेचे खासदार आहेत तर त्यांच्याकडे भाजपची मदार दिली आहे. महायुतीला सत्तेवर आणायचे आहे अशी सावध भूमिका त्यांनी घेतली आहे.

माजी राज्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil yadravkar) हे महायुतीचे एक घटक आहेत परंतु ते सध्या स्वतंत्र पक्षाची घोषणा करत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवून घेतली आहे. नुकतीच त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली असून राजश्री शाहूआघाडी या पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. राजश्री शाहू विकास आघाडीकडून शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे (Prakash awade) यांनी इचलकरंजीतून राहुल आवाडे आणि हातकणंगलेतून जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे (Vinay Kore) हे स्वतः पन्हाळा-शाहुवाडी विधानसभा लढवणार आहेत. जागावाटपाबाबत इतर घटक पक्षाचा कोणताही विचार न करता त्यांनी करवीर विधानसभेसाठी आपला उमेदवार म्हणून संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) यांचे नाव जाहीर केले आहेत.

आतापासूनच घटक पक्ष हे महायुतीवर  आपला दबाव टाकत महायुतीच्या अडचणीत वाढ करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी त्याचबरोबर होवू घातलेली तिसरी आघाडी त्यामुळे  राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय चुरस वाढलेली दिसते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles