Maharashtra Lockdown update :दोन दिवसात निर्णय घेऊ : मुख्यमंत्री

101
Live Janmat

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाऱ्यासारखा प्रसार होत आहे.  राज्याच्या यंत्रणेवर ताण येतोय. रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.  

उद्धव ठाकरे:

  • कठीण परिस्थितीतुन आपण चाललो आहोत 
  • लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे.
  • लॉकडाऊन हा पर्याय नाही पण जगाने तो स्वीकारला आहे.
  • वॅक्सिन दोन्ही डोस घेतल्या नंतर काही व्यक्ती कोरोना पॉस्टिव्ह आढळल्या आहेत या बाबत पंतप्रधान यांच्याशी बोललो.
  • देवेंद्र फडणवीसजी काल आपण बैठकीत नव्हता आपल्यासाठी ही बैठक आहे.
  • आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
  • तरुण वर्ग आता जास्त बाधित होतोय
  • आपल्याला एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे

देवेंद्र फडणवीस:

  • आम्हाला निमंत्रित केले या बद्दल धन्यवाद
  • कोरोना वाढतोय यात दुमत नाही
  • रेमेडिसीवर अवस्था बिकट आहे
  • कोरोना चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील याची व्यवस्था करणे आवश्यक
  • आणखी बेड निर्माण करावे लागतील
  • उद्योग क्षेत्र इतर ठिकाणाहून ऑक्सिजन कसा मिळेल हे पाहावे लागेल
  • निर्बंध असले पाहिजेत पण जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे
  • आम्ही मेलो तरी चालेल पण लॉक डाऊन नको अशी भूमिका आहे. याच आम्ही समर्थन करत नाही
  • राज्यावर ताण आहे हे मान्य, छोटा उद्योजक नोकरदार यांचा विचार व्हावा
  • लोकांची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे
  • आता राजकारण होऊ नये हे आम्हाला मान्य, पण आपण हे सत्ता पक्षातल्या मंत्र्यांनाही सांगा मुख्यमंत्री महोदय
  • त्यांनी उठायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, त्यामुळे आम्हाला उत्तर द्यावे लागते.
  • आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य सरकारला करू

 नाना पटोले:

आम्ही लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक, मात्र विरोधक अजूनही राजकारण करत आहे. आधी मदत मग लॉकडाऊन असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण सध्या जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्याची राज्यात परिस्थिती बिकट आहे. भयानक स्थितीला सामोरं जावं लागत आहे. आता ताटं आणि दीवे पेटवण्याची वेळ नाही. केंद्राने राष्ट्रीय महामारी घोषित केलीय. गुजरात हायकोर्टाने त्या सरकारला फटकारलं. पण महाराष्ट्रात राजकारण होत आहे. मदतीचा प्रश्न आहे, त्याला काँग्रेसचं समर्थन आहे. 20 लाख कोटींचा रुपया कुणाला मिळाला नाही. राज्याने विशेष पॅकेज तयार करावं. आम्ही केंद्राकडे बोट दाखवत नाही. मदतीची भूमिका राज्याची आहे.

बाळासाहेब थोरात:

  • हातावर पोट असणाऱ्याची परिस्थिती कठीण आहे
  • गेल्यावेळी आपण १० लाख जेवणाचे पॅकेट वाटले
  • मृत्यू थांबवण्यासाठी उपाय करायला हवे
  • राजकारण सोडून आज आपण एकत्र 
  • कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल
  • कटू निर्णयाची वेळ आली आहे
  • लॉकडाऊन करावा लागेल.

राजेश टोपे:

  • वाऱ्यांच्या वेगाने कोरोना पसरतोय
  • आपण त्यामुळे लसीकरणावर भर दिला पाहिजे
  • आय सी यू आणि व्हेंटिलेटरवर बेड वाढवण्याची आवश्यकता आहे

मनसेचा लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधांना विरोध:

लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध यांना मनसेचा विरोध आहे ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या रुग्णालयात आहेत. मात्र मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पक्षामार्फत ही भूमिका जाहीर केली