Monday, September 9, 2024

महाराष्ट्रात होणार तिसरी आघाडी, महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकत्र|

- Advertisement -

(Sambhajiraje tisari aaghadi) विधानसभा निवडणुका येवून ठेपल्या आहेत त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राजकीय रणनित्या आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्र येवून तिसरी आघाडी निर्माण करण्याचा जोर धरला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर स्वभिमानीचे राजू शेट्टी व इतर छोट्या-मोठ्या पक्षांनी मिळून तिसरी आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या आघाडी संदर्भात मुंबईनंतर पुण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

संभाजीराजे (Sambhajiraje) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील जनतेच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आम्ही वेगळा पर्याय देणार आहोत असे सांगितले. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने आम्हा सर्वांचा प्रवास सुरु झाला आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांशी आमची चर्चा सुरु आहे या सर्व बैठका सकारत्मक होत असून , आम्ही जनतेला नक्कीच एक वेगळा पर्याय देवू. अशी माहिती स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.

या बैठकीमध्ये बच्चू कडू यांच्यासह वंचित आघाडी यांना एकत्र घेऊन पर्याय देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती संभाजीराजेंनी (Sambhajiraje) दिली. पण, या बैठकीला बच्चू कडू हे प्रत्यक्ष उपस्थित न राहता  व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सहभागी झाले होते. तिसऱ्या आघाडीची घोषणा लवकरच करून राज्याच्या राजकारणाला योग्य तो पर्याय देवू अशी माहिती संभाजीराजे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ही बैठक स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे व इतर घटकपक्षांच्या समवेत एकत्र पार पडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles