Tuesday, September 10, 2024

कोल्पहापुरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव|

- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय दहीहंडी कोल्हापुरात असते यावर्षी सुधा कोल्हापुरातील दसरा चौकात युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. ऐतिहासिक दसरा चौकात पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेत ३ लाख रूपयांचे बक्षिस असणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात येणार आहे. स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. या सोबतच युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये, तर सात थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या सुरक्षेसाठी, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. शिवाय एखादा गोविंदा जखमी झाल्यास,त्याच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असणार आहे त्याचप्रमाणे सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक दसरा चौक येथे सज्ज असतील. दहीहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. दहीहंडी सोहळ्याच्या सुरवातीस श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक सोहळ्याचे दर्शन होईल. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून, स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

युवाशक्ती दहीहंडीचे प्रायोजक वरदविनायक पार्क इन्फ्रा प्रायव्हेट लिमिडेट हे आहेत. निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होईल. काल खासदार धनंजय महाडिक यांनी युवाशक्ती दहीहंडीच्या तयारी आणि नियोजनासाठी आढावा बैठक घेतली, युवाशक्तीचे सुमारे दोनशे कार्यकर्ते दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी २७ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles