Tuesday, September 10, 2024

देशात कधी थांबणार हे अत्याचार आणि क्रूर घटना ?

- Advertisement -

देशात अत्याचाराचा प्रकार काही थांबता-थांबेना नुकत्याच झालेल्या कोलकत्ता, बदलापूर रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर धाराशिव,पुणे अशा अनेक ठिकाणी अत्याचाराच्या क्रूर घटना समाजात घडत आहेत. देशात बलात्काराच्या घटना (Rape case in India) थांबवल्या पाहिजे.

समाजात मुलींना आता वावरताना भीती वाटत आहे असा एकही ठिकाण नाही कि ज्या ठिकाणी त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. समाजामध्ये अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत याला कुठे तरी आळा घालायला पाहिजे. २०२३ मध्ये महारष्ट्रात बलात्काराच्या तब्बल ७,५२१ घटना नोंदविल्या गेल्या आहेत. मुंबईमध्ये लैंगिक छळाच्या जानेवारी महिन्यात १८४ घटना घडल्या तर बलात्काराच्या ६० घटना घडल्या आहेत. दिवसाला अशा सहा घटना नोंदविल्या जात आहेत. देशात महिलांविरुद्ध गुन्ह्यांची संख्या २०२२ मध्ये तब्बल ४,४५,२५६  ऐवढी नोंद झाली होती. तर देशात तासाला ५१ गुन्हे होत असल्याचे समोर आले आहे.

दररोज महिलांच्या विरोधात घडणाऱ्या घटना या वाढत जात आहेत याला आळा घालणे हे काळाची गरज झाली आहे. देशात काळिमा फासवणाऱ्या अनेक घटना दररोज घडत आहे. समाजात महिलांच्यावर अत्याचार करून क्रू रपणे त्यांची हत्या केली जाते ही देशासाठी निंदनीय बाब आहे.

महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या विचारधारांची आहे परंतु सध्या महाराष्ट्राची स्थिती बिघडत चालली आहे. सुसंस्कृत म्हणून  ओळख असणाऱ्या महाराष्ट्राची काळिमा डागवली जात आहे. महाराष्ट्रात अश्या घटना वारंवार होत आहेत पुरोगामी महाराष्ट्रात अश्या बाबी अशोभनीय आहेत सरकारने याविरोधात तातडीने पाऊले उचलायला हवीत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles