कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने मुंबईसह देशभरात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केलीय.
कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने मुंबईसह देशभरात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केलीय. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना रस्त्यावर फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाने अनेक गाड्या रस्त्यावर फिरत असल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईमध्ये लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कॉलर कोड
लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवरील वाहनं कमी करण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न आहे.
- वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सेवा यांच्या गाड्यांसाठी लाल रंग
- भाजीपाला, किराणा, फळं आणि डेअरीच्या गाडीसाठी हिरवा रंग
- अत्यावश्यक सेवेसाठी पिवळा रंग
या गाड्यांवर लावण्यात येणारे हे 6 इंचाचं गोलाकार स्टिकर असतील. गाडीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर हे स्टिकर लावण्यात येतील. काही टोलनाके आणि नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून हे स्टिकर मिळतील.
टोलनाक्यांवर तपासणीमुळे डॅाक्टर, अॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय साधनांच्या गाड्या अडकत आहेत. यासाठी कलर कोड पॅालिसी सुरू करतोय. अत्यावश्यक सेवेतील लोकांना गाड्यांवर स्टिकर लावावे लागतील,” असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं.
पोलीस, महानगरपालिका, पत्रकार , डॉक्टर, अशा प्रकारे पोस्टर लावून काहीजण फायदा घेत आहेत. त्यामुळे गाड्यांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेसाठी काम करत आहेत का, याची तपासणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कलर कोड नेमका कशाप्रकारे?
वैद्यकीय कर्मचारी यांच्या गाड्यांसाठी लाल रंग, भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत. सीआरपीसी 144 अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत.