एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता.

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठे फेर बदल झाल्याने मुख्यमंत्री पदासाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौदाव्या विधानसभेची मुदत संपल्याने आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून, नव्या सरकारच्या शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे.

भाजपच्या हायकमांडकडून अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झालेला नसल्याने राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीला महाविजय मिळूनही मुख्यमंत्री कोण होणार, याचा तिढा सुटलेला नाही. भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला आहे, तर शिंदे यांनी आपल्याला किमान एक-दोन वर्षे या पदावर राहण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला पाठिंबा दर्शवल्याने भाजपच्या बाजूला एक मजबूत हात मिळाला आहे. या पाठिंब्यामुळे शिंदे यांच्या मागण्यांना फारसा वाव उरलेला नाही. भाजपच्या अधिक जागांमुळे आणि राष्ट्रवादीच्या समर्थनामुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद निश्चित मानले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची मागणी पुढे आली आहे. त्यात त्यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या चर्चांना भाजपने अद्याप मंजुरी दिलेली नाही. महायुतीच्या यशानंतर शिंदे यांना तातडीने बाजूला केल्यास चुकीचा संदेश जाईल, अशी त्यांची भूमिका आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी २ डिसेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होईल, असे संकेत दिले आहेत. या दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप निरीक्षक मुंबईत येऊन सत्ता स्थापनेवर चर्चा करतील. राज्याच्या नव्या सत्तास्थापनेसाठी तडजोडीच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. महाराष्ट्रातील जनता आणि सत्ताधारी गट याकडे उत्सुकतेने पाहत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles