Wednesday, November 13, 2024

करवीर विधानसभेत पी.एन.पाटीलनंतर कोणाला मिळणार संधी ?

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सध्या या तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे ते म्हणजे करवीर विधानसभेची (karvir assembly) करवीर मतदारसंघ हा कोल्हापूर शहराला लागून ते गगनबावडा तालुक्यापर्यंत पसरला आहे. करवीर विधानसभेमध्ये गटा-तटाचे राजकारण दिसून येते कारण येथे असणाऱ्या स्थानिक संस्था, डेअरी, कारखाने यांच्यावर तेथील राजकारण अवलंबून आहे.

करवीर विधानसभा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला दिसून येतो. १९६२ सालीकरवीर विधानसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस पक्षाचे पदार्पण झाले. १९७२ पासून १९९९  सालापर्यंत कॉंग्रेसचे आमदार या मतदारसंघात झाले आहेत. या काँग्रेसच्या बालेकिल्याला २००९  साली खिंडार पाडले ते म्हणजे शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनी. २००९ नंतर आजतागायत  या मतदारसंघात कॉंग्रेसचे पी.एन.पाटील (सडोलीकर) व शिवसेनेचे चंद्रदीप नरके आमने-सामने राहिले आहेत. २००९ आणि २०१४ साली शिवसेनेत चंद्रदीप नरके हे निवडूण आले होते. २०१४ साली चंद्रदीप नरके अवघ्या ७१० मतांनी जिंकले होते करवीर मतदारसंघात सर्वात कमी मत फरकाने निवडूण येणारे आमदार म्हणून त्यांची नोंद होते. दोन वेळा पराभूत झालेले पी.एन.पाटील (सडोलीकर) २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसमधून २२,६६१ मताधिक्याने निवडून आले. सध्या चंद्रदीप नरके हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

करवीर विधानसभा २०१४ निकाल :

उमेदवारपक्षमतेटक्केवारी
चंद्रदीप नरकेशिवसेना10799844.25%
पी.एन.पाटीलकॉंग्रेस10728843.96%

करवीर विधानसभा २०१९ निकाल :

उमेदवारपक्षमतेटक्केवारी
पी.एन.पाटीलकॉंग्रेस1,35,67552.91%
चंद्रदीप नरकेशिवसेना1,13,01444.07%


२०२४  कोल्हापूर लोकसभेचा विचार केला तर करवीर विधानसभेमध्ये (karvir assembly) पी. एन .पाटील यांनी एक वाक्य बोले होते ते म्हणजे शाहू महाराजांना जे लीड करवीर विधानसभेतून मिळेल ते कुठेही तुटणार नाही आणि निकालानंतर जवळपास ७१,४०० मताधिक्य मिळाले. परंतु निकालाच्या अगोदर . पी.एन .पाटील यांचा आकस्मित निधन झाला. त्यानंतर करवीर विधानसभेचा नवीन चेहरा कोण असू शकतो हे निश्चित नाही.


२०२४ राजकीय समीकरण

आगामी येणाऱ्या २०२४ च्या करवीर विधानसभा (karvir assembly) निवडणुकीसाठी  अनेक तगडे उमेदवार इच्छुक दिसतात. पी.एन .पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र राहुल पाटील हे काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात असू शकतात. यांच्या विरोधात मुख्य चेहरा म्हणजे शिवसेनेचे चंद्रदीप नरके सध्या चंद्रदीप नरके  शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे शिंदे यांच्यासोबत आहेत.  करवीर विधानसभेत (karvir assembly) भारतीय जनता पार्टी हा पक्ष खूप प्रभावी दिसतो. कारण भारतीय जनता पार्टी यांची बूथ रचना, प्रभावी कार्यकर्ते त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रभाव या विधानसभेत दिसून येतो, परंतु करवीर  विधानसभेतून भारतीय जनता पार्टीकडे प्रभावी नेता नाही. जे नेते आहेत ते तुल्यबळ नसले  तरी आनंद गुरव, हंबीरराव पाटील अशी नेते भारतीय जनता पार्टीकडून उदयास येत आहेत. त्यासोबतच आणखीन एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे २०१४  चे उमेदवार राजू सूर्यवंशी  २०१४ च्या निवडणुकीत चांगले मताधिक्य करवीर विधानसभेतून घेतले आहेत त्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच संताजी घोरपडे यांनी या करवीर विधानसभेत (karvir assembly)करवीर  महोत्सव हा कार्यक्रम घेतला होता. तेव्हांपासून ते विधानसभेची तयार करताना दिसत आहे. जनसुराज्य पक्ष किंव्हा  अपक्ष म्हणून ते निवडणूक रिंगणात असू शकतात.

 
२०२४ करवीर  विधानसभेचा विचार केला तर महायुती जर एकत्र असेल तर चंद्रदीप नरके यांना उमेदवारी मिळू शकते  का हे पहावं लागणार आणि महाविकास आघाडी कडून पी.एन. पाटील यांच्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण प्रभावी उमेदवार असेल हे निश्चित नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles