देशात अत्याचाराचा प्रकार काही थांबता-थांबेना नुकत्याच झालेल्या कोलकत्ता आणि बदलापूर या ठिकाणी घडलेल्या क्रूर अत्याचाराचा घटना ताज्या असतानाच आणखीन एक धक्कादायक घटना कोल्हापुरातील शिये या ठिकाणी घडली आहे.
१० वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात आढळून आला आहे. प्राथमिक अंदाज असा दर्शवतो की मुलीवर अत्याचार करून मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बिहार येथील एक मजूर जोडपं कामानिमित्त कोल्हापुरातील शिये, रामनगर परिसरा या ठिकाणी राहायला आले. गुड्डू सिंह हा आपल्या कुटुंबासह रामनगर या ठिकाणी वास्तव्यास आहे. हे दोघेही शिरोली एमआयडीसी येथे एका कंपनीत मजूर म्हणून काम करतात. कामानिम्मित्त बुधवारी सकाळी आठ वाजता दोघेही कामाला गेले होते. बुधवारी सायंकाळी ते कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना आपली मुलगी कुठेही दिसली नाही. त्यांनी तात्काळ आजूबाजूला तसेच नातेवाईकाकडे त्याचा शोध घेतला परंतु तरीही तिचा शोध लागला नाही. तिचा मामाही घरी होता, मामाला विचारणा केली असता, त्याने सांगितले की मुलीने दुपारी जेवण केले आणि ती मोबाईल घेऊन बसली त्यानंतर मामाला कामावर जायचं असल्याने तो झोपला मात्र त्यानंतर ती मोबाईल ठेवून कधी घरातून निघाली हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुलगी बुधवारी दुपारपासून घरातून गायब झाली होती. शिये रामनगर येथील दहा वर्षी परप्रांतीय मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री शिरोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक रहिवासी सोबत घेवून शिये येथील रामनगरात परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि परिसरातील आसपासच्या जनतेला विचारपूस करून तिचा शोध घेत होते परंतु सकाळी चार वाजेपर्यंत पोलिसांना शोध लागला नाही त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या श्वान पथकाने अल्पवयीन मुलीचा मृतदेह रामनगर येथे एका ऊसाच्या शेतामध्ये घरापासून अवघ्या काही अंतराच्या परिसरात शोधून काढला. यावेळी प्राथमिक माहितीनुसार मुलीच्या अंगावर कपडे होते परंतु चप्पल आणि अंतर्वस्त्र बाजूला पडलेली होती. यावरून मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय देखील व्यक्त केला आहे. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असूनही तपासणी झाल्यानंतर निष्कर्ष काढता येईल असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिये रामनगर परिसरात १० वर्षीय मुलगीवर अत्याचार करून हत्या केलेल्या या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.