Wednesday, June 7, 2023
No menu items!

TAIT exam|अर्जासाठी ४ दिवसांची मुदतवाड

TAIT exam

मुंबई : काही वर्षांपासून शिक्षक भरती प्रलंबित होती. राज्य शासनाने शिक्षक अभियोग्यता २०२३ (TAIT exam) परीक्षेची घोषणा केली व यासाठी अर्ज मागविण्यात आले. परंतू ctet परीक्षा दिलेल्या विद्यार्थी यांचा निकाल प्रलंबित असून विद्यार्थी याबाबत संभ्रमात होते. याबाबत दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत महत्वाचा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर केला. ज्या विद्यार्थ्यांचे CTET परीक्षेचे निकाल प्रलंबित आहेत. आशा विद्यार्थी यांना देखील TAIT exam साठी अर्ज करता येणार असून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आणखी चार दिवसांची अर्जासाठी मुदतवाड देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Common Entrance Test| MHT CET परीक्षांचे वेळापत्रक जारी

Samadhan Yojana

सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर:-

                 MHT CET ९ ते २० मे दरम्यान.

  आगामी 2023 24 या शैक्षणिक वर्षातील सामायिक प्रवेश परीक्षांचे (Common Entrance Test) संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CEEL) प्रसिद्ध केले आहे.

आगामी वर्षात विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना तयारी करण्याबाबत कल्पना मिळेल.

urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली

MPSC Mains | सरकारच्या नाकर्तेपणामुळे उमेदवारांवर पुनःश्च आंदोलनाची वेळ

ZP recruitment| भरती लांबणीवर, विद्यार्थी टांगणीवर

SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सावळागोंधळ

अभ्यासक्रम आणि सीईटी संभ्याव्य तारीख:- 

या तारखा संभाव्य असल्याने त्यात बदल होऊ शकतो.

       अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी उत्पन्न अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असणारी MHT Common Entrance Test ९ ते २० मे दरम्यान होणार आहे.

MBA CET 18 व 19 मार्च या दिवशी होईल.

MCA CET 25 आणि 26 मार्चला होईल.

हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी कधी अभ्यासक्रमाची असणारी MAH BHMCT CET 20 एप्रिलला होणार आहे.

 पदव्युत्तर अभ्यासक्रमाची MHMCT CET 30 एप्रिल ला होणे अपेक्षित आहे.

बी प्लॅनिंग सीईटी 23 एप्रिल ला होणार आहे.

बी डिझाईन सीईटी 30 एप्रिल ल होणार आहे.

विधी पाच वर्षात अभ्यासक्रम – 1 एप्रिल 

विधी तीन वर्ष – 2 आणि 3 मे.

बीए बीएड, बीएस्सी बीएड -2 एप्रिल.

बीएड- एमएड -2 एप्रिल

 बीएड , बीएड एलेक्टिव -23 ते 25 एप्रिल.

शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी – 3 मे

 शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी – 23 एप्रिल

शिक्षण शास्त्र पदव्युत्तर -9 मे

 फाइन आर्टर – सीईटी -16 एप्रिल.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

मुंबई दि,२१ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु(Shivram Hari Rajguru) स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, मातृभक्त शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे सदस्य सत्यशील राजगुरू, उमा संजीव महादेकर, स्मारक निर्मिती ग्रुपचे ॲड. प्रथमेश पाडेकर आदी उपस्थित होते.

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक

मुंबई दि. 28 :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत (curb the financial resources) पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.

दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी (26/11) मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत श्रीमती रूचिरा कंबोज यांनी केले.

भारत 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. उद्या दिल्ली येथे बैठक आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने ‘दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा’(curb the financial resources) या विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले, दहशतवाद विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. दहशतवाद आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध ठोस कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने, प्रशिक्षण स्थळे शोधून त्यांना असलेले राजकीय समर्थन आर्थिक आणि वैचारिक संरक्षण नष्ट करणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत, दहशतवादी गटांनी त्यांना मिळत असलेल्या मिळकतीच्या पद्धतीमध्ये  विविधता आणली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या अनामिकतेचा फायदा घेऊन व्हर्च्युअल चलने वापरून निधी उभारणी सुरु केली आहे. या संदर्भात, अधिक विचारमंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारात घेऊन नाविन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या समितीच्या विशेष बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली.

दहशतवादविरोधी लढाई सामूहिकपणे लढणे गरजेचे

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहशतवादविरोधी लढाई ही सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले. या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी समितीची महत्वपूर्ण परिषद मुंबईत झाली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ज्या ताजमहाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तेथे या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसह सर्व राज्याचे गृहमंत्री उपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.

26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

सुरूवातीला दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. गॅबॉन प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री तथा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौस्सा अडामो यांच्यासह भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रूचिरा कंबोज यांनी केले.

Governor releases the book ‘Republic Coins of India’ by Dilip Rajgor

Mumbai 27 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the book ‘The Republic Coins of India’ authored by Numismatics expert Dr. Dilip Rajgor at Raj Bhavan Mumbai on Thursday.

Senior Supreme Court lawyer Dineshbhai Mody, Chairman of the Hinduja Foundation Paul Abraham and coin collectors and members of numismatics fraternity were present.

Speaking on the occasion the Governor said coins of India are a direct evidence of India’s glorious past. Stating that those who forget history have no future, the Governor said preserving coins is preserving history. Complimenting author Dr Dilip Rajgor for bringing out an authoritative volume on the coins of India from 1947 to 2022, the Governor said the book will prove to be a milestone for future researchers of coins and history.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २५: दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याने आज अनोखी दिवाळी अनुभवली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे औक्षण करीत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. मुख्यमंत्र्यांच्या या आगळ्यावेगळ्या कृतीमुळे भारावून गेलेले शेतकरी बांधव वर्षातून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी बळीराजाची कदर केल्याची भावना व्यक्त करताना दिसून आले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा (agricultural action development plan) तयार करीत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि धामधुम सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले वर्षा निवासस्थान आज गजबजून गेले होते ते राज्यातून आलेल्या बळीराजाच्या आगमनाने…राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यातून प्रातिनिधीक स्वरुपात शेतकरी बांधव सपत्नीक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते. पहिल्यांदाच अशा स्वरुपाची दिवाळी वर्षा येथे साजरी झाल्याचे अनेकांनी सांगितले.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गडचिरोली येथील दौरा आटोपून मुख्यमंत्री वर्षावर आले. त्यानंतर त्यांनी त्यांची पत्नी सौ. लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत, स्नुषा सौ. वृषाली यांनी प्रत्येक शेतकरी कुटुंबांचे जागेवर जाऊन औक्षण केले. त्यांना साडी- चोळी, धोतर आणि भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबिय आपले औक्षण करताय हे पाहून शेतकरी बांधव आणि त्यांचे कुटुंब हरखून गेले होते.

या हृदय सोहळ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बळीराजा हा राज्याच्या विकासात(agricultural action development plan) महत्त्वाचा घटक असून त्याच्यासाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांमुळे बळीराजाला नैसर्गीक आपत्तीला तोंड द्यावे लागते. याप्रसंगी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की, तुम्ही धीर सोडू नका, खचू नका..आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात आली. सेंद्रीय शेतीवर भर देतानाच विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना मंजूरी देऊन लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आणि कृषि विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बळीराजाला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात दुधे दाम्पत्याला दिवाळी फराळ भरवला. वर्षावरील हिरवळीवर शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रत्येक शेतकऱ्याची जातीने विचारपूस करीत होते. यावेळी अमरावतीच्या सौ. अर्चना सवाई आणि अहमदनगरचे सतीष कानवडे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रास्ताविक केले. आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंद अडसुळ यांच्यासह सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे आदी उपस्थित होते.

‘सारथी’च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री|SARATHI

नाशिक, दि. 21 ऑक्टोबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा) : सारथीच्या (SARATHI) नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना  मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याचे उदात्त धोरण अंगिकारणाऱ्या ‘सारथी’ ला सर्वतोपरी मदत शासनामार्फत केली जाईल, असे आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे  पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र किशोर दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, छत्रपती संभाजीराजे भोसले, सारथी चे अध्यक्ष मधुकर कोकाटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपवियवस्थापकीय संचालक नितीन गावंडे तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचार, प्रेरणेतून सर्वसामान्य लोकांच्या मनातले कल्याणकारी शासन म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत, त्यादृष्टिनेच काम करत आहोत. मराठा समाजातील तरूणाईला कौशल्य विकासाचे धडे देण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि अर्थिक विकास होण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम सारथी च्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. नाशिक येथे उभारण्यात आलेले ‘सारथी’ चे हे कार्यालय केवळ एक शासकीय वास्तू नसून ते अनेक तरूणांच्या भविष्याचे शिल्पकार असलेली प्रेरणा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा राजमुकुट हे सारथी चे बोधचिन्ह असून ते दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढायची प्रेरणा देणारे चिन्ह आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून सारथी(SARATHI) ला आपला दृष्टिकोन केवळ कागदावरच न ठेवता तो कृतीत साकारण्याची संधी मिळाली आहे. विविध स्पर्धा परीक्षा,निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तरुण व विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने सर्वांना लाभली आहे, त्यासाठी शासन सारथी च्या सर्व आवश्यकतांची प्रतीपूर्ती करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

व्यापक जनहितासाठी काम करत असताना प्रसंगी कुठलेही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेण्याची तयारी असल्याचे सांगून जे मराठा समाजातील तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवूनही नियुक्तीपासून वंचित होते, त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत. मराठा समाजाला  न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते शासन करत राहील, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा देताना गरजू लोकांना शासनामार्फत दिली जाणारी शिधाभेट साखर, रवा, तेल व चनाडाळ ही वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या. सततच्या पावसाने शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आहे. त्यासाठी व्यापक स्वरूपाचे परिणामकारक निर्णय घेतले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी एनडीआरएफ च्या निकषापेक्षा दुपटीची मदत शेतकरी बांधवांना देण्याबरोबरच निकषांत न बसणाऱ्या व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटीही भरपाई दिली जाणार असल्याचे सांगितले.

सारथीच्या मध्यमातून तरूणांना दिशा छत्रपती संभाजी राजे भोसले

सारथीच्या(SARATHI) माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या तरुणांना दिशा मिळते आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे सारथीमुळे विविध स्पर्धा परिक्षांमधून ५० विद्यार्थ्यांची आज देशाच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी पदांवर निवड झाली आहे.  सारथी च्या जडण-घडणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान व पाठबळ असून त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानतानी सारथी च्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारथी चे अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ६ नोव्हेंबरला ‘पेट’ परीक्षा | sppu result

SPPU PHD
SPPU PHD

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विविध विषयांच्या पीएचडी विषयासाठी ६ नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा (PET SPPU 2022) होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन माध्यमाद्वारे विद्यापीठाने निर्धारित केलेल्या केंद्रांवरून होणार असून एकूण १०० मार्काची असेल. यामध्ये संशोधन कार्यप्रणालीवर ५० गुण व विषयावर आधारित ५० गुण असे स्वरूप असेल. यामध्ये बहुपर्यायी १०० प्रश्न असतील. ज्याचे नकारात्मक गुण असे मूल्यांकन होणार नाही. खुल्या प्रवर्गास ५०% तर राखीव प्रवर्गास ४५% गुण मिळणे आवश्यक आहेत. या परीक्षेचा निकाल sppu result १० नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. sppu result

sppu result

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे : मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे प्रधानमंत्र्यांना विनंती

मुंबई, दि. १८ : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच(Open sugar export policy) सुरु ठेवावे.  कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.

आपल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, २०२१-२२ मध्ये साखर निर्यातीच्या बाबतीत केंद्र सरकारने खुले धोरण(साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच(Open sugar export policy) सुरु ठेवावे.  कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.) स्वीकारल्याने जगात साखर निर्यातीत भारत मोठा निर्यातदार ठरला. यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि परकीय चलन सुद्धा वाढले.

यंदापासून साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे असे कळते.  मात्र, ही पद्धत आपल्या कारखानदारांना तोट्याचीच आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, मार्चपर्यंत देशातला गळीताचा हंगाम संपतो.  १ एप्रिलपासून ब्राझील मधील हंगाम सुरु होतो आणि स्पर्धा निर्माण होऊन इतर साखर निर्यातदार देशांना त्याचा फायदा होतो. शासनाला साखर निर्यातीसाठी कोणतेही अर्थसहाय करावे लागत नाही. कोटा पद्धतीमुळे ज्या कारखान्यांना निर्यातीत रुची नाही ते देखील प्रत्यक्ष निर्यात न करता पैसा कमविण्यासाठी त्यांचा कोटा इतरांना हस्तांतरित करू शकतात. कोटा पद्धतीमुळे अनावश्यकरित्या प्रशासकीय अडथळे निर्माण होईल तसेच पारदर्शकता राहणार नाही. तसेच निकोप व्यवसायाची संधी राहणार नाही.

२०२१-२२ मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती जास्त असल्याने ब्राझीलसाठी साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे फायदेशीर ठरत आहे.  पुढील काळात मात्र कच्च्या तेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता असल्याने ब्राझील देखील इथेनॉलपेक्षा साखर उत्पादनावर भर देण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे सुद्धा भारताला तोटा होऊ शकतो. राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशन तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना फेडरेशन त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील खासगी क्षेत्रातील कारखाने या सर्वांची मागणी खुल्या साखर निर्यात धोरणाचीच अंमलबजावणी करण्याचीच आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन द्यावेत, असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पुढील २ दिवसानंतर पाऊस ओसरणार – हवामानतज्ञ पंजाबराव डख

परभणी: भारतातील प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख(Punjabrao Dakh) यांनी पुढील दोन दिवसात पावसाचा जोर राहणार असून त्यानंतर २० ते २७ तारखेच्या दरम्यान हवामान कोरडे राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तरी या दरम्यान सोयाबीन, भात, मका अथवा तत्सम पिकांची कापणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

२० तारखेनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार वाढणार आहे. परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी पुढील आठवड्यात शेतकर्‍यांनी सुगीची कामे करून घ्यावी. अन शेतकर्‍यांनी आपले नुकसान टाळावे. प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख यांच्या या हवामाना अंदाजामुळे शेतकर्‍यांच्यामध्ये आशावादी वातावरण पसरले आहे.

‘समग्र रायगड’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

'Samagr Raigad' coffee table book

मुंबई, दि. 17 :- रायगड जिल्ह्याची माहिती देणाऱ्या ‘समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण’(Samagr Raigad) या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन झाले.

यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण’(Samagr Raigad) या कॉफी टेबल बुकमध्ये प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे – गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक – धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग – कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशी उपयुक्त माहिती आहे. बुक निर्मितीमध्ये रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व मीडिया आर अँड डी दिलीप कवळी यांनी सहभाग घेतला आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदसंख्येत वाढ करावी- समन्वयक समितीची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा २०२२ ही जुन्या अभ्यासक्रमाने होणारी शेवटची परीक्षा आहे. २०२० व २०२१ या मागील २ वर्षात कोरोनामुळे PSI(EXAM of PSI) परीक्षासाठी वयानुसार शेवटची संधी आहे, असे हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करत आहेत. ही स्पर्धा परीक्षेची(EXAM of PSI) तयारी करणार्‍या मुलांसाठी शेवटची संधी असल्याने २०२२ परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात यावी. यामुळे PSI ६०३ पदांची संख्या १००० प्लस होईल. सुमारे ६०० PSI ते API प्रमोशन या महिन्यात होणार आहे. सदर प्रमोशमन गृहमंत्रींनी लवकर केले तर या रिक्त जागा 24/12/2022 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी समाविष्ट करता येतील. ही रिक्त होणारी PSI पदे २०२२ मुख्य परीक्षेमध्ये सामाविष्ट केल्यास महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी यांना याचा फायदा घेता येईल. असे मत स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती, महाराष्ट्र निवेदनाद्वारे राहुल कवठेकर, नीलेश गायकवाड, महेश घरबुडे, विश्वंभर भोपळे यांनी व्यक्त केले. यावर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लवकर तोडगा काढावा अशी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी यांच्याकडून मागणी होत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृती योजना २०२२-२३ | Sarthi scholarship

Sarathi Scholarship
Sarathi Scholarship

सन २०२२-२३ या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा, कुणबी,
मराठा-कुणबी व कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास
संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फ़त डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती(Sarathi scholarship) या योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

शासनाची अधिसूचना

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण ब मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक
मंडळाच्या बैठकोत मान्य ठरावानुसार राज्यातील ३०० मराठा,कुणबी,मराठा-कुणबी,कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना सन
। २०२२-२३ या वर्षात शासन निर्णय ईबीसी-२०१७/प्र.क्र.४०२/शिक्षण -१, दि.०८/११/२०१७ व शासन शुध्दीपत्रक क्र.:
ईबीसी-२०१७/प्र.क्र.४०२/शिक्षण -१, दि. १९/०३/२०१८ शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट “ब” मध्ये नमूद शेक्षणिक
संस्थाच्या इतर शाखा / उपशाखा निर्माण झाल्यास त्यामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना देखील सदरहू योजना लागू राहील.
या नामांकित संस्थामधील पूर्णवेळ = डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती
प्रदान करण्याचा निर्णय सारथीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सन २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षांकरिता

मराठा,कुणबी,मराठा-कुणबी,कुणबी-मराठा(Sarathi scholarship) विद्यार्थ्यांकडून दि. २१.११.२०२२ सायंकाळी ६. १५ पर्यंत अर्ज मागविण्यात
येत आहेत.

अर्ज करण्यासाठी –

– https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6xR73ne6ozEd3XKocfpVMbIn4HNe426rIshqW-2c25HfUZg/viewform

Sarthi scholarship

Mulayam Singh Passed| मुलायम सिंह यांचे निधन

आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास ८२ वर्षाचे सपाचे संरक्षक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव(Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. मुलायमसिंग गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात ते व्हेंटिलेटरवर होते. गेल्या रविवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर सपा कार्यकर्त्यांमध्ये तसेच उत्तरप्रदेशाबरोबर भारतभर शोककळा पसरली आहे.

कुस्तीपट्टू- शिक्षक ते राजकारण असा प्रवास

राजकीय पटलावर उदय होण्यापूर्वी ते एक उत्तम कुस्तीपट्टू आणि शिक्षक होते. त्यांतर त्यांनी तीनदा उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री पद भूषिविले. तसेच ते केंद्रात संरक्षण मंत्री देखील होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले. २२ ऑगस्ट पासून त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. १ ऑक्टोबरच्या रात्रीपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मेदांता येथील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते.

मुलायमसिंह यादव(Mulayam Singh Yadav) यांचे पार्थिव दिल्लीहून लखनौला आणण्याची तयारी सुरू आहे. तेथून पार्थिव इटावा येथे नेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत. उद्या दुपारी ३ वाजता मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमानात सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मेदांता रुग्णालयात भेट घेऊन दर्शन घेणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.

“मुलायम सिंह यादवजी एक विलक्षण व्यक्तिमत्त्वाने संपन्न होते. लोकांच्या समस्यांबद्दल संवेदनशील असलेले एक नम्र आणि पृथ्वीवरील नेते म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांनी चिकाटीने लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा केली.लोकनायक जेपी आणि डॉ. लोहिया यांच्या आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली.

आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी ते एक प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप व्यावहारिक होते आणि राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला. जेव्हा आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. तेव्हा मुलायमसिंह यादव यांच्याशी माझे अनेक संवाद झाले. जवळीक चालू राहिली आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो. त्याच्या मृत्यूने मला वेदना होतात. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्या संवेदना. शांतता.” या ट्विटसोबतच त्यांनी मुलायम सिंह यांच्यासोबतची अनेक छायाचित्रेही ट्विट केली.

उत्तरप्रदेशसारख्या भारतातील प्रमुख राज्याचा राजकारणात बराच काळ ते केंद्रस्थानी होते. देशातील राजकारणात ठसा उमटवणारे अभ्यासू नेते(Mulayam Singh Yadav) म्हणून त्यांची नेहमी नोंद घेतली जाईल. देशातील विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

‘हॅलो नव्हे – वंदे मातरम्’|Vande Mataram

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” (Vande Mataram) या अभियानाचा शुभारंभ झाला. या अभियानाविषयी…

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात दि. 2 ऑक्टोबरपासून “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” (Vande Mataram) या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजेच गांधी जयंती दिनीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून झाला.

“जनगणमन”हे आपले राष्ट्रगीत आणि “वंदे मातरम्”(Vande Mataram) हे राष्ट्रीय गाणे हे सर्वमान्य झाले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर काही ठिकाणी ‘नमस्ते’ असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, “वंदे मातरम्” हा फक्त नारा किंवा संबोधन नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे. “वंदे मातरम्”बाबत प्रचार-प्रसार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास व त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

लम्पी चर्मरोग : राज्य शासनाच्या उपाययोजना|Lumpy Virus

वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 या वर्षामध्ये लिहिले होते. संस्कृत भाषेतील हे मूळ गीत पाच कडव्यांचे होते. मात्र सध्या पाचपैकी फक्त एक कडवेच गायले जाते. 1896 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत सर्वप्रथम गायले गेले. 1905 ला झालेल्या बंगालच्या फाळणी दरम्यान, “वंदे मातरम्” हा परवलीचा शब्द होता. अनेक क्रांतिकारकांनी या गीताचा उद्घोष करत बलिदान दिले. “इन्कलाब जिंदाबाद” व “वंदे मातरम्” या दोन शब्दांनी स्वातंत्र्य चळवळ भारावून गेली होती. या गीतावर व त्याच्या गायनावर इंग्रजांनी बंदीही घातलेली होती. मात्र तत्कालीन राजकीय पक्ष, क्रांतिकारक व सर्वसामान्य नागरिक यांनी ही बंदी झुगारून वंदे मातरम् गायनास सुरुवात केली होती. स्वातंत्र्य चळवळीतील धगधगत्या अग्निकुंडात बलिदान देणाऱ्या अनेक वीरांच्या मुखातून ‘वंदे मातरम्’ हा शब्द आला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मंत्र ठरलेले हे गीत सर्वमान्य होते. दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या संविधान परिषदेच्या बैठकीची सुरुवातही या गीताने झाली होती. 1950 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी “वंदेमातरम्” या गीताबद्दल पुढीलप्रमाणे नमूद केले होते :

“शब्दों व संगीत की वह रचना जिसे जन गण मन सम्बोधित किया जाता है, भारत का राष्ट्रगान है; बदलाव के ऐसे विषय, अवसर आने पर सरकार अधिकृत करे और वन्दे मातरम् गान, जिसने कि भारतीय स्वतन्त्रता संग्राम में ऐतिहासिक भूमिका निभायी है; को जन गण मन के समकक्ष सम्मान व पद मिले। (हर्षध्वनि)। मैं आशा करता हूँ कि यह सदस्यों को सन्तुष्ट करेगा।(भारतीय संविधान परिषद, द्वादश खण्ड, 24-01-1950). या विधानावरून या गीताची महती स्पष्ट होते.

मद्रास उच्च न्यायालयाने शाळा व महाविद्यालये यांमधून “वंदे मातरम्” हे गीत देशभक्तीची भावना रुजविण्याकरिता आठवड्यातून किमान एकदा तरी गायले जावे, असा निर्णय दिला होता. थोडक्यात ‘वंदे मातरम्’ हा शब्द सर्वांसाठीच प्रेरणादायी व सन्माननीय आहे.

“हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाबाबत बोलताना मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणतात की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्” ने शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांशी होणाऱ्या संवादात, सुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात.

महाराष्ट्रात ‘नमस्कार’ व ‘राम राम’ हे दोन शब्द आजही मोठ्या प्रमाणात संबोधनात्मक वापरण्यात येतात. त्याशिवाय हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात. वेगवेगळे समूह, समुदाय, धर्म यांमध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत. वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे. शासकीय कार्यालयात किंवा शासन व्यवहारात दूरध्वनीवरून किंवा समोरासमोर भेटल्यानंतर कोणत्या शब्दाने अभिवादन करावे याबाबत स्पष्ट निर्देश कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप मिळेल असे मला वाटते.

लघु चित्रपटाच्या माध्यमातून “वंदे मातरम्” बाबत जाणीवजागृती करण्यात येणार आहे. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता “वंदे मातरम्” असे अभिवादन करावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले.

यासाठीची काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे नमूद केली आहेत.

  1. सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून “हॅलो” संबोधन न वापरता, “वंदे मातरम्” (Vande Mataram) म्हणावे.
    2. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित / अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा / महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला “हॅलो” असे न म्हणता “वंदे मातरम्” असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना “वंदे मातरम्” (Vande Mataram) असे संबोधन करावे.
  2. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस “वंदे मातरम्” हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
    4. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात “वंदे मातरम्” ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
  3. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
    6. विविध बैठका / सभांमध्ये वक्त्यांनी “वंदे मातरम्” (Vande Mataram)या शब्दांनी संभाषणाची सुरुवात करावी.

– वर्षा फडके-आंधळे,

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE

IND vs AUS | Australia will undoubtedly be the happier of the two teams, with Travis Head and Steve Smith looking in sublime nick. Marnus Labuschagne was dismissed in only the second over of the session, with Mohammed Shami opening his wickets tally, but nothing has worked out in India’s favour so far.

IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE

Head swung momentum in Australia’s favour with aggressive batting early on, and currently, he is unbeaten on 60 runs from 75 deliveries. On the opposite end, Steve Smith has played the quintessential anchor, remaining unbeaten on 33 runs from 102 deliveries.

Travis Head along with Steve Smith drove Australia to 170/3 at Tea on Day 1 of the World Test Championship (WTC) final against India at The Oval. The pair have added over 90 runs for the fourth wicket, with Travis Head also slamming a 60-ball half-century.

Earlier, Mohammed Shami gave India a perfect start in the second session, getting rid of Marnus Labuschagne (26) in his first ball. Australia had resumed the session from 73/2. Meanwhile, India had started the day on a strong note as Mohammed Siraj packed Usman Khawaja for 0. David Warner and Labuschagne then held fort and added 69 runs for the second wicket, before Warner fell for 43(60). | IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE

India vs Australia Live Score: Tea | Jadeja bowls the final over before Tea and one run come from it. Australia reach 170/3 at Tea, a good session for the Kangaroos as they were 73/2 at the end of opening session. 

Meanwhile Travis Head and Steve Smith have added 94 runs for the fourth wicket.

विद्यार्थी पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करा

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन जवळपास दोन महिने उलटले असूनही शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली नाही या कारणास्तव राज्यातील डीएड व बीएड अभियोग्यता धारक विद्यार्थी नैराश्याच्या  परिस्थितीत आहेत.शिवाय कोर्टाने सुद्धा पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करण्यासाठी सुचना दिली आहे,त्यामुळे आधार वैद्य अवैद्य ही निरंतर प्रक्रिया आहे ती चालूच राहणार आहे. तरी काही अपवादात्मक शाळांना नियम व अटी घालून पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करणे व 2nd TAIT उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तातडीने पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करणे.

मोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्रमोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्र

15 जून पासुन नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे,त्यामुळे तातडीने विद्यार्थ्यांना शाळेवर शिक्षक उपलब्ध करून द्यावेत,अन्यथा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागु शकते याची नोंद घ्यावी.अन्यथा नाईलाजास्तव पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय ,जिल्हाधिकारी कार्यालय,आयुक्त कार्यालय येथे शिक्षक मिळण्यासाठी आंदोलन,मोर्चे काढले तर याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार असेल.

Talathi bharti 2023 online form date ; syllabus

त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यानी केली.

ind vs aus talathi bharti 2022 | राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती BTS and Ranveer Singh sppu exam