जिल्हा युवक काँग्रेसचे covid-19 हेल्पलाईन ठरत आहे जीवनदायिनी

Live Janmat

कोल्हापूर – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने मा.सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले covid-19 हेल्पलाइन कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या हेल्प लाईन साठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष माननीय सतेज उर्फ बंटी पाटील यांंच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या हेल्पलाइन चे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा.संजय सरदेसाई (कोल्हापूर ग्रामीण ) व जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ता मा.अभिषेक मिठारी (कोल्हापूर शहर) हे करत आहेत. या हेल्पलाईन द्वारे लोकांना रेमेडी शिवर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, ambulance इत्यादीसाठी कोल्हापूर जिल्हा covid-19 आपत्ती व्यवस्थापन केंद्र यांच्याशी संपर्क साधून गरजू लोकांना आतापर्यंत मदत केली जात आहे.

या हेल्पलाइनच्या माध्यमातून जिल्ह्यात 120 लोकांना मदत केली आहे. ही हेल्पलाइन अतिशय महत्त्वाचे असून ही हेल्पलाईन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी अशीच सुरू ठेवावी अशी मागणी होत आहे..

https://twitter.com/satyajeettambe/status/1385238832723808261?s=19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here