सांगली जिल्ह्यातील प्रीतमची चटका लावणारी एग्झिट आणि एमपीएससीची जीवघेणी स्पर्धा…

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच शिक्षण घेऊन आयुष्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिले होत प्रीतम कांबळे या युवकाने. यासाठी एमपीएससीच्या अनिश्चितता ठासून भरलेल्या क्षेत्रात तो प्रवेश करतो. आपल्या सर्व ताकदीच्या सीमांना तो मर्यादेपेक्षा अधिक ताणून अक्षरशः जीव तोडून अभ्यास करतो. पण नियतीला काही वेगळंच मान्य होत. कोरोनाने परीक्षांच्या नियोजनावर अनिश्चितता आली आणि सगळं गणित बिघडलं.
पुण्यासारख्या ठिकाणी कोरोना अक्षरशः हातपाय पसरून निजला होता. अशा या महाजालात जाऊन तो स्वतःच्या बुद्धीचा कस पाहत होता. परवाच्या राज्यसेवा परीक्षेच्या दोन दिवस अगोदर त्याला अचानक त्रास जाणवू लागला. काहीतरी अघटित घडणार याची किंबहुना त्याला कल्पना आली असावी. पण इतरांना त्रास नको म्हणून त्याने लगेचच आपली कोव्हीड चाचणी करून घेतली. आणि जे व्हायचं तेच झालं. तो कोव्हीड पॉझिटिव्ह आला. उद्यावर येऊन ठेपलेली कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरची राज्यसेवा परीक्षा आणि त्यात कोव्हीड पॉझिटिव्ह. हातातोंडाशी आलेला घास नियती हिरावून घेत आहे की काय अशीच ही परिस्थिती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच पेपर होता त्या दिवशी त्याची तब्येत आणखीन बिघडली. यातच त्याला उपचारासाठी प्रथम पुणे आणि नंतर सांगलीला दाखल केले. मात्र दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी त्याची मृत्यूशी चाललेली झुंज संपली. एका स्वप्नाचा असा शेवट होणे हे नक्कीच दुःखद आणि वेदनादायी आहे. प्रीतम हा फक्त कोरोनाचा बळी नसून तो व्यवस्था,राजकीय अनास्था, सामाजिक दडपण आणि बऱ्याच गोष्टींचा बळी आहे.
आणखीन किती जीव जाणार…?
दोन दिवसापूर्वीच एमपीएससी करणार्या विद्यार्थ्याच्या मृत्युने विद्यार्थ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले. आता आज आणखी एका विद्यार्थ्याचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्हाला आमचा जीव महत्वाचा आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.
- Upcoming Ullu Web Series 2023: You can’t miss it!
- Malaika Arora: Mesmerizing Latest Photoshoots
- World of Ullu Web Series video : streaming Online now
- Ullu Web Series Video – Top 5 web series you must watch!
- Malaika Arora: A Fashion Icon Redefining Elegance and Style
पण एवढं मात्र नक्की..स्पर्धा जरूर असावी पण ती जीवावर बेतेल अशी नक्कीच नसावी. येत्या रविवारी आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षा नियोजित केली आहे. मात्र राज्यातील अनेक विद्यार्थी आज कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. परवा वैभव शितोळे या विद्यार्थ्याचा सुद्धा असाच दुर्दैवी अंत झाला. काहीजण गंभीर परिस्थितीत उपचार घेत आहेत. ज्यांना काहीच त्रास नाही असे लोक परीक्षा घ्या म्हणून आवाज वाढवत आहेत. मात्र ग्राउंड रिऍलिटी जोपर्यंत जनतेसमोर येत नाही तोपर्यंत या प्रकरणातील दाहकता कधीच कुणाला जाणवणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर मनापासून अभ्यास केला आहे आज जे या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत अशा विद्यार्थ्याबद्दल आपण कधी संवेदनशीलपणा दाखवणार आहोत ? का माणूस म्हटलं की स्वार्थीपणाच समोर येणार…माणुसकी नाही का ?
सरकारची भूमिका महत्वाची
आता सर्व विद्यार्थी सरकारच्या भूमिकेची वाट पाहत आहेत.. सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर तो जाहीर करावा.
राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सचिव मोहसिन शेख यांनीही उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे एमपीएससी परीक्षेसंदर्भात मागणी केली आहे.

जे काल पारेंत परीक्षा ह्यावी म्हणून आंदोलन करत होते तेच आज कोरोनाची काळजी करत आहेत? कमाल आहे!