पंढरपूर-मंगळवेढामध्ये वाढलेल्या कोरोनाला जबाबदार कोण ?

Live Janmat

पंढरपूर मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लोकांच्या अंगलट आली आहे. निवडणूक संपताच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे. आता हॉस्पिटलमध्ये रेमडेसीवीर नाही ना बेड, ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे . रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि अनेक मृत्यु देह स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी जातात तिथे सुद्धा मोठ्या रांगा लागल्या आहेत

आज पत्रकार परिषद मध्ये पंढरपूर व मंगळवेढामध्ये वाढलेल्या कोरोनाला याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या मुळे तसं झाले. राज्यसरकरच्या हातामध्ये ज्या निवणुका होत्या त्या सर्व पुढे ढकलण्यात आल्या. ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल तमिळनाडू मध्ये आसाम मध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे हे सर्वजण जावून तिथे प्रचार करत होतेच ना, कुंभ मेळाव्यात लाखों लोक स्नान करत होतेच ना, त्यामुळे त्याला जबाबदार हे नागरिकच असेही ते म्हंटले. पुढे असेही म्हटले आहे की आम्ही आवर्जून सर्वांना सांगितलेलं की जे काही नियम बनवलेले आहेत त्याच तंतोतंत पालन कराव. पण काही मंडळी बिना मास्कचे होते.

आता या परिस्थितीमध्ये ज्या गावात जोर जोरात प्रचार सभा झाला होत्या त्यामध्ये  भोसे असेल बोराळे, लवंगी , ही सर्वच गावे होटस्फोट झाली आहेत.

पंढरपूर व मंगळवेढामध्ये हजारो लोकांवर उपचार चालू आहेत. दरम्यान प्रचारामध्ये सहभागी असणार्‍या नेत्यांनाही कोरोनाची लागण झालेले आहे. संजय शिंदे, रनजीत सिंग मोहिते, आमोल मिटकरी आदींचा समावेश आहे.

प्रत्येक गावांमध्ये कसलीच सोय नाही. असल्या परिस्थितीमध्ये पंढरपूर व मंगळवेढा मधील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे आतातरी ज्यांनी ही निवडणूक केली या निवडणुकीत प्रचार केला त्या लोकांनी तरी आता गांभीर्याने  घेणे गरजेचे आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here