Thursday, September 12, 2024

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन मार्फत 3,765 रक्त पिशव्यांचे एकाच दिवशी संकलन

- Advertisement -

राज्यातील अपुरा रक्त साठा लक्षात घेता वर्ल्ड मराठा ऑर्गनायजेशन ने आजपर्यतच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक 3,765 इतक्या रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतेक सर्व रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा दिसून येत आहे. प्लाझ्मा शिवाय इतर पेशंटना रक्ताची गरज असते. अपघात, शस्त्रक्रिया, थायलसेमिया या रुग्णांनाही रक्ताची कमतरता जाणवत आहे. या सर्वांचा विचार करून, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जगातील मराठ्यांची सगळ्यात मोठी संघटना असलेल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) मार्फत काल 20 जिल्ह्यात एकाच दिवशी महाराष्ट्रातील 35 ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 35 ठिकाणी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवला गेला. याला विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत गेला .

खालील ठिकाणी शिबिराचे आयोजन केलेले होते.
1)पिंपरी-चिंचवड ४४९ 2)हडपसर २४० 3)वाघोली १७५ 4) शिक्रापूर १४५ 5) कात्रज १८५ 6) कोथरूड १५० 7) अकोला 44 8) अमरावती 41 9)लातूर 95 10) लातूर(बोरगाव)57 11) रायगड 56 12) रत्नागिरी 42 13) संभाजीनगर 103 14) जालना 54 15) परभणी 60 16) कोल्हापूर 344 17) धुळे 35 18) नांदेड 17 19) बुलढाणा 16 20) बीड 72 21) सांगली 291 22) इस्लामपूर(सांगली) 136 23) जत (सांगली) 64 24) सोलापूर 31 25) अहमदनगर 100 26) अहमदनगर (श्रीगोंदा) 45 27) अहमदनगर(पारनेर) 54 28) अहमदनगर(शिर्डी) 70 29)अहमदनगर (संगमनेर)45 30)अहमदनगर(शेवगाव)80 31) मुंबई 202 32)सातारा 143 33) कोरेगाव (किनी) 51 34) बीड(सावरगाव) 38 35)सोलापूर(अकलूज) 36

आजपर्यत च्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक 3,765 इतक्या रक्त पिशव्यांचे संकलन झाले आहे.

सरकरलाही लाजवेल असे काम WMO मार्फत होत आहे.

आजवर वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) समाजाच्या प्रत्येक संकटात ठाम उभी राहिली आहे. मग ते महापूर, दुष्काळ, रक्तदान, वैद्यकीय मदत, मराठा आरक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असोत किंवा स्रियांच्या समस्या किंवा यांच्यावरील अत्याचार असोत. दिवस असो ‌वा रात्र WMO चा प्रत्येक सदस्य मदतीसाठी सदैव तत्पर  होता आहे. कोणत्याही चांगल्या कार्यासाठी WMO सदैव आपले योगदान देत आहेत.

Follow us

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) मार्फत HELPLINE NUMBER 7767 969696 चालू केला आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles