सचिन खिलारीचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी |

- Advertisement -

2024 पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सचिन खिलारीने (Paris Paralympics 2024 Sachin Khillari) भारताच्या पदरात रौप्य पदक आणले. महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे राहणारा सचिन खिलारीने इतिहास रचला आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या रौप्य पदकासह सचिन खिलारी 40 वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते. सचिन खिलारीच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या 21 झाली आहे. सचिन खिलारीने 16.32 मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले तर कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने 16.38 च्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले आणि क्रोएशियाच्या लुका बाकोविचला कांस्यपदक मिळाले. सचिनने यापूर्वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.

34 वर्षीय खेळाडूने दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि 16.30 मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे 2024 मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा विक्रम केला होता. सचिन खिलारीचे रौप्यपदक हे सध्या सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये पॅरा-ॲथलेटिक्समध्ये जिंकलेले 21 वे पदक आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles