Saturday, April 1, 2023
No menu items!
Homeशिक्षणसारथी संस्थेचे 52 विद्यार्थी UPSC ची Mains परीक्षा उत्तीर्ण

सारथी संस्थेचे 52 विद्यार्थी UPSC ची Mains परीक्षा उत्तीर्ण

सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील 233 विद्यार्थ्यांनी UPSC ची मुख्य परीक्षा जानेवारी 2021 मध्ये दिली. या परीक्षेचा निकाल 23 मार्च 2021 रोजी घोषित करण्यात आला आहे.

या परीक्षेत सारथी संस्थेचे 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

हे 52 विद्यार्थी पुणे, अहमदनगर, बुलढाणा, सातारा, सांगली, अमरावती, जळगाव, सोलापूर, नागपूर, नाशिक, परभणी, लातूर, रत्नागिरी, ठाणे, वाशीम, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, जालना, हिंगोली व धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

UPSC च्या मुलाखती ( Interview) एप्रिल व मे महिन्यात होतील. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी हा शेवटचा व सर्वात महत्वाचा टप्पा आहे.

मुलाखत ही दिल्ली येथे असल्याने, सारथी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे Mock Interviews हे IAS, IPS, IRS अधिकारी व विषय तज्ज्ञांमार्फत घेतले जातील.
विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी whatsapp ग्रुप तयार करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शंका समाधान केले जाईल.
दिनांक 27 मार्च ला या 52 विद्यार्थ्यांना zoom meeting द्वारे IAS, IRS, IRPFS अधिकाऱ्यांनी 4 तास मुद्देसूद मार्गदर्शन केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी UPSC Interview मध्ये भरपूर मार्क मिळवून IAS/IPS/IRS/IFS असे उच्च पदस्थ अधिकारी व्हावेत यासाठी सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सर्व मराठा/कुणबी संघटना व जनता सुद्धा यासाठी अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील आहेत.
पुन्हा एकदा या सर्व यशस्वी 52 विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

सारथी संस्थेचा लाभ हा गोर-गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे अनेक नवनवीन उपक्रम घेणे गरजेचे आहे. तसेच या संस्थेला भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular