न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा -देशाचे 48वे सरन्यायाधीश

Live Janmat

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी कार्यक्रमात जस्टीस एन.व्ही.रमणा ((Justice NV Ramana) यांनी देशाचे 48वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातुन सरन्यायाधीश होणारे ते पहिले न्यायाधीश ठरले आहेत. ऑगस्ट 2022 पर्यंत ते सरन्यायाधीश म्हणुन कार्यरत असतील.

न्यायमूर्ती नथालपती वेंकट रामण्णा ((Justice NV Ramana)

नथालपती वेंकट रामण्णा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957ला आंध्र प्रदेशच्या पोन्नवरम गावात झाला होता. त्यांचे आई-वडील शेती करत होते. त्यांनी विज्ञान आणि विधी विषयांमध्ये पदवी घेतली आहे. आपल्या कुटुंबातील ते पहिलेच वकील आहेत. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधाशीश शरद बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली होती.

27  जून 2000 ला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 10 मार्च 2013 ते 20 मे 2013 यादरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. 2 ऑक्टोबर 2013 रोजी त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमण्यात आले. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com