पन्हाळा-शाहुवाडी विधानसभेत कोण मारणार बाजी ?

- Advertisement -

काही दिवसापूर्वी विशाळगड अतिक्रमण मोहीम हटाव हे प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होत यामध्ये बीड, संभाजीनगर, जालना, सांगली, आणि  पुणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरला. पण हे विशाळगड प्रकरण ज्या विधानसभा मतदारसंघात झाले त्या पन्हाळा-शाहुवाडी panhala-shahuwadi assembly विधानसभेमध्ये याची फारशी चर्चा झालेली दिसत नाही.


पन्हाळा आणि शाहूवाडी या दोन्ही तालुक्यांचा मिळून पन्हाळा-शाहूवाडी panhala-shahuwadi assembly मतदारसंघाची निर्मिती झाली आहे यामध्ये लहान मोठ्या वाड्या, वस्त्या आणि गावे मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनय कोरे हे आहेत. त्यांनी 2009 आणि 2019 च्या  विधानसभा निवडणुकीत आपला विजय मिळवला. 2014 च्या निवडणुकीत सत्यजित पाटील (सरूडकर) यांच्या विरोधात अवघ्या 388 मतांनी विनय कोरे यांचा पराभव झाला. यानंतर मात्र विनय कोरे यांनी  2019 च्या निवडणुकीमध्ये चांगले मताधिक्य घेऊन 27,863 मतांनी आपला विजय निश्चित केला. पन्हाळा शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघात प्रमुख लढत हे सत्यजित पाटील आणि विनय कोरे यांच्यात असते. 2004 आणि 2014 च्या निवडणुकीत सत्यजित पाटील हे विजयी झाले होते.

2014 पन्हाळ-शाहुवाडी विधानसभा निकाल:

उमेदवारपक्षमतेटक्केवारी
सत्यजित पाटीलशिवसेना74,70235.67%
विनय कोरेजनसुराज्य पक्ष74,31435.50%

2019 पन्हाळ-शाहुवाडी विधानसभा निकाल:

उमेदवारपक्षमतेटक्केवारी
विनय कोरेजनसुराज्य पक्ष1,24,86853.94%
सत्यजित पाटीलशिवसेना97,00541.90%

सध्याचा विचार केला तर विनय कोरे हे भाजपला पाठिंबा देऊन महायुतीसोबत  एकत्र आहेत. तर सत्यजित पाटील हे शिवसेना (उ.बा.ठा)  पक्षाला पाठींबा देत महाविकास आघाडीसोबत आहेत.

 नुकत्याच झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सत्यजित पाटील यांना अगदी शेवटच्या क्षणी लोकसभेची उमेदवारी मिळाली  होती. त्यामुळे त्यांनी कमी वेळेत जास्त कसरत करून पन्हाळा-शाहूवाडी panhala-shahuwadi assembly या विधानसभेतून लोकसभेला जवळपास 19,000 एवढे मताधिक्य घेतले. पन्हाळा आणि शाहूवाडी या तालुक्याचा विचार केला तर शाहुवाडी तालुक्यातून 22,377 मताधिक्याने सत्यजित पाटील हे पुढे होते तर पन्हाळा तालुक्याचा विचार केला तर 3,380 मतांनी धैर्यशील माने हे पुढे होते.

पन्हाळ-शाहुवाडी 2024 विधानसभा समीकरण


येणाऱ्या आगामी विधानसभेचा विचार केला तर अनेक तगडे उमेदवार या विधानसभेतून दिसतात मुख्य लढत हे विनय कोरे आणि सत्यजित पाटील यांच्यात होऊ शकते. परंतु सत्यजित पाटील यांना उमेदवारी नाही मिळाली तर महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण असेल हे येणारी वेळच सांगेल. या विधानसभेतील करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील असे अनेक तगडे उमेदवार आपल्याला दिसतात. या अगोदरही या उमेदवारांनी निवडणूक लढवून चांगले मताधिक्य घेतले होते.
2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर महायुती एकत्र असेल तर विनय कोरे यांना उमेदवारी मिळेल आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरु आहे. यांना उमेदवारी नाही मिळाली तर उमेदवार कोण असेल हे येणारी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles