कोरोना चे पेशंट दिवसेंदिवस वाढत जात आहेत आश्चर्याची बाब म्हणजे कोरणा च्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे
काय आहे एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांची मागणी
गेल्यात दोन-तीन दिवसांमध्ये mpsc करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरणा मुळे मृत्यू झाला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले दोन दिवस झाले विद्यार्थी परीक्षा पुढे ढकला म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारपुढे गाऱ्हाणे मांडत आहेत. प्रत्येक जण लोकप्रतिनिधींना कॉल आणि मेसेज करून विनंती करत आहेत की परीक्षा पुढे जाण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना सांगा पण मागील अनुभव लक्षात घेता यावेळी विद्यार्थ्यांचे कडे कोणीही लक्ष देईना झाल आहे असे विद्यार्थ्यांचे मत आहे.
पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी राहतात. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांना कोरणा ची लक्षणे दिसत आहेत. विद्यार्थी परीक्षेमुळे दवाखान्यात जाण्याचे टाळत आहेत. पुण्यामध्ये कोरोना स्थित आवाक्याबाहेर गेलेली असून PMC ने लष्कराची मदत मागितली आहे.
MPSC समन्वय समिती यांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन परीक्षा पुढे जावी अशी मागणी केली आहे. तसेच आबासाहेब पाटील समन्वयक मराठा क्रांती मोर्चा यांनी परीक्षा बाबत निर्णय लवकर घ्यायला सांगितला आहे अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.
प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीवाचा आहे, पूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने धुडगूस घातलेला असताना विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळणे बरं नव्हे.
अविनाश दांडगे (औरंगाबाद)
सरकारने हा विषय संवेदनशीलपणे हाताळून परिणामी कठोरपणे निर्णय घेऊन संयुक्त पूर्वपरीक्षा कमीत कमी एक महिना पुढे ढकलावी ही आमची सरकारला विनंती आहे.
राज्यातील कोविड विषाणूचा वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने ११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त गट -ब पूर्व परीक्षा किमान १ महिना समोर ढकलावी . यासाठी खालील गोष्टी कारणीभूत आहेत .
संतोष मगर , बीएड डीएड संघटना , महाराष्ट्र
१) काही उमेदवार हे कोविड पॉझिटिव्ह आहेत व उपचार घेत आहेत त्यामुळे परीक्षा झाली तर त्यांच्यावर अन्याय होईल.
२) पुणे ,मुंबई ,औरंगाबाद यासारख्या मोठ्या महानगरात बरेच उमेदवार हे कोविड ची लक्षणे असताना देखील केवळ परीक्षा आहे म्हणून दुखणे अंगावर काढत आहेत .त्यामुळे ते स्वतः सोबत इतरांचे आरोग्य धोक्यात घालत आहेत .जर परीक्षा काही काळ समोर गेली ,तर असे उमेदवार वेळीच उपचार घेतील.
३)बऱ्याच उमेदवारांची परीक्षा केंद्रे ही स्वतः च्या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे असे उमेदवार महानगराकडून गावाकडे प्रवास करतील . अशा परिस्थितीत ते कोविड प्रसारक ठरू शकतात यामुळे आपल्या ” ब्रेक द चेन ” या मोहिमेचा हेतू निष्फळ होईल
४) राज्यात कोविड चा उद्रेक होत आहे ,अशात बऱ्याच जिल्ह्यात व्हेंटिलेटरची संख्या अपुरी पडत आहे ,त्यामुळे अशा काळात कोविड उच्छाद मांडत असताना सगळ्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
५) राज्यातील कठोर निबंधाच्या काळात विद्यार्थी कमी म्हटले तरी ६० ते १०० किलोमीटरचा प्रवास करतील .त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अनेक अडचणी उदभवतील जसे की , वाहन ,जेवण ,इत्यादी.
तसेच जर सरकारने परीक्षा पुढे ढकळल्या नाहीत तर आम्ही .सर्वजण सामूहिक आत्मदहन करू असे बालाजी दळवे यांनी म्हंटले आहे.