महाराष्ट्रात दहावीची परीक्षा रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, बारावीची परीक्षा होणारच! राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय!
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारला देखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेवरून पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता. मात्र, करोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होतं आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनानं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचं आरोग्य आमच्यासाठी पहिलं प्राधान्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण लॉकडाऊन
लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं.
सर्व मंत्र्यांनी लॉकडाऊनचा आग्रह धऱला आहे. जे गोरगरीब लोक असतात. त्यांच्यावर ज्या अडचणी येतील त्यांच्यावर कसा अन्याय होणार नाही, त्यावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. आपल्याला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी ऑक्सिजन जनरेटर प्लांट लवकरात लवकर जनरेट करावा याची मागणी मंत्रिमंडळाने केली आहे. सर्वांत महत्त्वाचा विषय हा लसीचा आहे. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण होणार आहे. यानंतर लसीकरण जोरदार पद्धतीने होणार.वाटल्यास बाकीच्या खर्चात कपात करु मात्र, लसीकरण युद्धपातळीवर करणार आहोत, तसे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
दरम्यान, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला असून येत्या काही तासांत त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.