सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही-प्रविण दरेकर

32
Live Janmat

विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूने महाराष्ट्रा पुन्हा एकदा हादरला आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.

व्यवस्थेवरचा ताण समजू शकतो, चूक होणं समजू शकतो, परंतु पुन्हा पुन्हा चूक होत आहेत. भंडाऱ्याचा प्रसंगांमध्ये 10 लोक गेली, भांडुप, नाशिक इथे ही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. नाशिक मध्ये कोणाचा दोष आहे…जर तिथे व्यवस्थित देखभाल झाली असती तर आज लोकांचे प्राण वाचले असते. या पापाचे धनी हे सरकार आहे. असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकार वर टीका केली.
सरकार मधील मंत्र्यांनी ,पालकमंत्र्यांनी एक एक जिल्हा घेऊन जर योग्य नियोजन करून, आढावा घेतला असता, योग्य बैठका घेतल्या असत्या तर रोज जे लोकांचे प्राण जात आहेत ते वाचले असते. या सरकारला एक क्षणही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. भंडारा, भांडुक सारख्या घटनांमधून जर बोध घेणार नसेल तर कश्यासाठी आपण आहोत याचा विचार सरकारने केला पाहिजे.

केवळ मीडिया समोर यायचं, राजकीय गोष्ठी करायच्या, एकमेकांवर उणिधुनी काढायची जर एवढा वेळ व्यवस्थेमध्ये घातला असता तर आज निष्पाप बळी गेले नसते असेही ते म्हणाले.