कोल्हापूर मध्ये गेले महिनाभर कोरोनाचा प्रकोप चालू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना वाढत चालला आहे. काळजी करणारी बाब म्हणजे मृत्यू दरही वाढत आहे. (120 bed covid center in Kolhapur by Dhananjay Mahadik | 20 reserved beds for small children)
याच पार्श्वभूमीवर माजी खा. धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांनी कोल्हापूर मध्ये कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. भाजप, ताराराणी आघाडी आणि कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्यातून 120 बेडचे कोरोना सेंटर उभारण्यात येणार आहे. यातील 20 बेड हे लहान मुलांसाठी राखीव असून सर्व रुग्णांना औषधोपचारसह, नाष्टा, जेवण मोफत देण्यात येणार आहे. याठिकाणी अखंड ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी जंबो ड्युरा सिलेंडरची सुविधा करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी विशेष तज्ञांची ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
माजी खा. धनंजय महाडिक यांनी सोमवारी हॉकी स्टेडीयम जवळील महापालिकेच्या इमारतीची पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत अशावेळी महाडीक परिवाराने पुढाकार घेऊन महापालिकेच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले आहे. (120 bed covid center in Kolhapur by Dhananjay Mahadik | 20 reserved beds for small children)
[…] […]