महाराष्ट्रातील आघाडीप्रमाणे देशात ही आघाडी व्हावी. महाराष्ट्रात ज्यापद्धतीनं तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्याला उत्तम नेतृत्व दिलं. त्याचप्रमाणे देशात उत्तम आघाडी निर्माण व्हायला हवी, असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. “देशाला उत्तम आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे. तशी आघाडी देश पातळीवर असायला हवी.
याबाबत शरद पवार यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी काही अशीच निर्माण झाली नाही. तीन पक्षांनी मिळून उद्धव ठाकरे यांना नेता केलं आणि सरकार उत्तम चाललंय. त्याच पार्श्वभूमीवर देशात सर्वांनी एकत्र येऊन अशी नवनवीन व्यवस्था तयार करायला हवी”, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत नसला तरी तो संपूर्ण देशात आहे. आसाममध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं. पण ते सत्तेवर येऊ शकले नाहीत. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आलं. पण काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे. या देशाला उत्तम आघाडीची गरज आहे, असंही राऊत म्हणाले.
पंतप्रधान महाराष्ट्राचं कौतुक करतात | पण फडणवीस टीका करतायत, मग योग्य कोण?
काँग्रेस पक्ष आघाडीचा आत्मा असून त्या पक्षाशिवाय देशात कोणतीही आघाडी तयार होऊ शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
- तुमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवा : वैशाली क्षीरसागर यांचे महिलांना भावनिक साद
- उत्तरची जनता महायुतीच्या बाजूने; राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित : आदिल फरास
- सिद्धार्थनगरशी माझं नातं अतूट : राजेश क्षीरसागर
- राजेश क्षीरसागर यांचा कार्यअहवाल सर्वांगीण कामाचे उत्तम प्रगतीपुस्तक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील आघाडीच्या दहाही जागा येणार नाही;धनंजय महाडिक