पंतप्रधान महाराष्ट्राचं कौतुक करतात | पण फडणवीस टीका करतायत, मग योग्य कोण?’

Live Janmat

सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकतेच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक करण्यात आले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटला रिप्लाय देताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे . महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? असा सवाल जयंत पाटील.

शनिवार 8 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद झाला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. “तसंच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असं सांगत मोदींनी राज्याच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.”

मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणे,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिलेल होते.

महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? असा सवाल जयंत पाटील  (Jayant Patil) यांनी केला आहे. (Prime Minister praises Maharashtra | But Fadnavis is criticizing, so who is right?)

सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात ऑक्सिजन व्यवस्थापनाबाबत मुंबईतील यंत्रणांचे कौतुक केले होते. मुंबईत आतापर्यंत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईतील उपलब्ध ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग, चांगल्याप्रकारे वितरण आणि बफर स्टॉक तयार करणे यासह बीएमसीची विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहास झाला आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com