सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकतेच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक करण्यात आले होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटला रिप्लाय देताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे . महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? असा सवाल जयंत पाटील.
शनिवार 8 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद झाला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. “तसंच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असं सांगत मोदींनी राज्याच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.”
The Hon'ble CM requested more linkages in the procurement of oxygen for the state, gave information about several measures taken & plans to counter the third wave.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 8, 2021
The Hon’ble CM thanked the Hon’ble PM for continuous guidance & for accepting various requests made by the state.
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणे,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिलेल होते.
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणे,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र pic.twitter.com/NigmpjOfcX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 8, 2021
- सकल हिंदू समाजाच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार
- Top Ullu Web Series to Watch Online | Stream Now on Ullu App
- Thyroid Trouble: 5 Common Mistakes Patients Make and How to Avoid Them for Better Health
- JEE Main Result 2025 Live: Final Answer Key & Scorecard to Be Released at jeemain.nta.nic.in
- Akshay Kumar Thanks PM Narendra Modi for Honouring C Sankaran Nair Legacy
महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? असा सवाल जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. (Prime Minister praises Maharashtra | But Fadnavis is criticizing, so who is right?)
@Dev_Fadnavis जी, आजच मा. @PMOindia यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 8, 2021
आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही? https://t.co/kpIk2341Tf
सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात ऑक्सिजन व्यवस्थापनाबाबत मुंबईतील यंत्रणांचे कौतुक केले होते. मुंबईत आतापर्यंत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईतील उपलब्ध ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग, चांगल्याप्रकारे वितरण आणि बफर स्टॉक तयार करणे यासह बीएमसीची विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहास झाला आहे.