सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. बऱ्याच ठिकाणी माणुसकीचे दर्शन होताना दिसत आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. असच काहीसं दृश्य सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात पहायला मिळाल.
काल छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंतीनिमित्त शंभूराजे प्रतिष्ठाण लवंग यांच्या वतीने कोरोना प्रतिबंधक फवारणी व मास्कचे वाटप करून राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. (Corona preventive spraying and distribution of masks by the youth. Sambhaji Raje Jayanti celebration)
महाराष्ट्राचे धाकले धनी छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती निमित्त शंभूराजे प्रतिष्ठाण यांच्या वतीने सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून वाड्या वस्त्या, शाळा, सार्वजनिक ठिकाणे येथे कोरोना प्रतिबंधक फवारणी केली, तसेच त्यांच्या मार्फत मास्कचे वाटप ही केले. यावेळी शंभूराजे प्रतिष्ठाणच्या कार्यकर्तेनी सुरक्षित अंतर ठेवून हे काम केले आहे.
या सामाजिक उपक्रमांचे माळशिरस तालुक्यामध्ये कौतुक होत आहे.