मराठा आरक्षण | काळे झेंडे दाखवत सांगली येथून डिजिटल आंदोलनास सुरुवात

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आंदोलन

सांगली येथून मराठा आरक्षण संदर्भात स्टैंड फ़ॉर मराठा रिजर्वेशन या हैशटैग द्वारे काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा निषेध काळे झेंडे दाखवून करण्यात आला. राजकीय स्वार्थापोटी २०१४ साली असंविधानिक राणे समितीच्या आधारे निवडणुकांपूर्वी न टिकणारे ईएसबीसी आरक्षण देऊन तत्कालीन आघाडी सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा अनादर केला आहे. गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून टिकणारे आरक्षण देता येत असताना देखील वेगळा प्रवर्ग करून न टिकणारे एसईबीसी आरक्षण देणारे युतीचे तत्कालीन फडणवीस सरकारने देखील मराठा समाजाचा अधिकार डावलला आहे.सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाच्या अहवालाची विस्तृत व अचूक मांडणी न करू शकलेले महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आरक्षण मिळवायच्या वाटा बंद केल्या आहेत.

अनेक ठिकाणी काळ्या गुढ्या उभा करून निषेध तर

विद्यमान सरकार कोणत्याच प्रकारे मराठा समाजाला सहकार्य न करता मराठा समाजाचे शक्य तितके नुकसान करत आहे.समांतर आरक्षण,फी माफी,वस्तिगृह,सारथी,अण्णासाहेब पाटील महामंडळ व 2014 मधील खुल्या प्रवर्गातून निवडी करीता पात्र असलेले उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थागितीपूर्वी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तयांचा प्रश्न असे कोणतेही मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी सरकार व विरोधातील भाजपा अपयशी ठरली असून मराठा समाजावर अन्यायच करत आहे.

त्यामुळे आपण एकमेकांत पक्षीय राजकारणावरून भांडण्यापेक्षा एकत्र यावे .आपण एकत्र आलो तरच टिकू अन्यथा आपल्या पुढच्या पिढ्यांची माती आपल्याच हाताने होईल असे भावनिक आवाहन सकल मराठा समाज सांगली यांच्या वतीने करण्यात आले.मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर डिजिटल माध्यमातून राजकीय पक्ष मराठा समाजात दूही माजवत असल्याबाबत सर्वच राजकीय पक्षांचा निषेध करण्यात आला.मराठा समाजाच्या वर होणाऱ्या अन्याय दूर करण्यासाठी ही लढाई घराघरातून लढवायची तयारी मराठा समाज नक्की पक्ष विरहीत उभारेल यामुळे सर्व राजकीय पक्षानी राजकारण बंद करुण मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन सकल मराठा समाज सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या आंदोलनात सकल मराठा समाजाच्यावतीने पृथ्वीराज पवार,ए.डी.पाटील,सतिश साखळकर,अविनाश जाधव,आनंद देसाई,विश्वजीत पाटील, चेतन माडगुळकर,चेतक खंबाळे,अभिजीत शिंदे,अमृतराव सूर्यवंशी,विशाल लिपाने पाटील,धनंजय शिंदे,प्रशांत भोसले,दादासाहेब यादव,राहूल पाटील, इत्यादीसह जिल्ह्यातील मराठा बांधव सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles