पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने कोरोंनाच्या काळात फेब्रुवारी २०२० मध्ये परिपत्रक काढून भरमसाठ शुल्क वाढ(fee hike) केली. या विरोधात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
ऑफलाइन पद्धतीने विद्यापीठ सुरू झाल्यानंतर या सर्व प्रकारच्या फी वाढीला सामोरे जावे लागले. या विरोधात ११ ते १३ जुलै २०२२ दरम्यान विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेऊन विद्यापीठाने तात्काळ पीजी आणि पीएचडी कोर्सची शुल्क तात्काळ कमी केले. यामध्ये ट्यूशन फी, ग्रंथालय, वसतिगृह, परीक्षा या व इतर शुल्कामध्ये दुपटीने फी वाढ (fee hike) आहे. त्याप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. ही संबधित वाढ कमिटी स्थापून कमी करू असे लेखी आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने कृती समितीला दिली. याचा पाठपुरावा करताना दरदहा दिवसांनी कृतीसमिति प्रशासनास भेटत होती. परंतु विद्यापीठ प्रशासन याकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष केले जात आहे व समितीच्या कार्यकर्त्यांना असभ्य वागणूक मिळत आहे. अशी माहिती कृतीसमितीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाढवली भरघोस फी|SPPU
कृतीसमितीच्या राहुल ससाणे, तुकाराम शिंदे, पौर्णिमा गायकवाड, अक्षय निर्मळ यांनी आज बेमुदत धरणे आंदोलन पुकारले.