निवडणुकीचे बिगुल वाजणार- सूत्रांची माहिती

टाकळी सिकंदर : येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीच्या(Bhima election) हालचाली वेगाने वाढल्या आहेत. या निवडणुका दिवाळीपूर्वीच होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिली. त्यामुळे १९५०० सभासद या पंचवार्षिक निवडणूक आपल्या मताचा हक्का बजावणार आहे. निवडणुकीस आवश्यक सर्व बाबींची पूर्तता निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे हे करत असून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका दिवाळीपूर्वी घेण्यास प्राधिकरण सज्ज झाले आहे.

या कारखान्यावर महाडीक गटाची एक हाती सत्ता असून त्यांचा विजयावरील दावा अत्यंत प्रबळ मानला जातो. या निर्णयाने विरोधी गटास मात्र तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र नक्की !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here