कोल्हापूर: टी.बी. मुक्त भारतासाठी (T. B. free India) देशभर निश्चय मित्र अभियान राबवले जात आहे. यामध्ये खाजगी संस्था व व्यक्ति यांनी सामाजिक दायित्व म्हणून अशा रुग्णांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक ते न्यूट्रिशन व प्रोटीनचा पुरवठा करावा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास १२०० च्या दरम्यान नोंदणी झाली असून ६०० रुग्ण टी. बी. चे सक्रिय रुग्ण आहेत. यातील खा. धनंजय महाडीक व भीमा परिवाराने ५०० रुग्णांची जबाबदारी स्वीकारली अशी माहिती धनंजय महाडीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच लवकरच टी. बी. मुक्त भारत होईल याबाबत आशावादी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- तुमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवा : वैशाली क्षीरसागर यांचे महिलांना भावनिक साद
- उत्तरची जनता महायुतीच्या बाजूने; राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित : आदिल फरास
- सिद्धार्थनगरशी माझं नातं अतूट : राजेश क्षीरसागर
- राजेश क्षीरसागर यांचा कार्यअहवाल सर्वांगीण कामाचे उत्तम प्रगतीपुस्तक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील आघाडीच्या दहाही जागा येणार नाही;धनंजय महाडिक