नव्या अभ्यासक्रमाला विरोध करत पुण्यात MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत आयोग नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची मागणी पूर्ण करुन नोटीफिकेशन काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आ.दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली. युवक काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात भाजपचे आमदार, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार उपस्थित होते.mpsc pune
या आधी आयोगाने रात्री दोन-तीन वाजता परीक्षेच्या बदलाबाबत नोटीफिकेशन टाकले आहे. त्यामुळे आमच्या मागणीसंदर्भातील कोणत्याही निर्णयाचं जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवणार आहोत, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. mpsc pune
MPSC Students Protest। MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन
एमपीएससी परिक्षेचा अभ्यासक्रम बदलला आणि राज्यात याबाबतच्या आंदोलनांना सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली तर यानंतर एमपीएससी आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे बदल हा २०२३ पासूनच लागू करावा या साठीही विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.
आता आज पुन्हा ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी बालगंधर्व चौकात आंदोलनास सुरवात झाली आहे . त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे समजते.mpsc pune