Thursday, November 21, 2024

Barti मार्फत MPSC परीक्षेसाठी निशुल्क प्रशिक्षण | ‘येथे’ अर्ज करा

- Advertisement -

Barti मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2023-24 प्रशिक्षणसाठी पुणे व नाशिक येथे निशुल्क अनिवासी प्रशिक्षण साठी अर्ज मागविण्यात येत आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र युवक युवतींनी https://register.bartieducare.in/student/register लिंकवरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.

talathi bharti – तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट

पुणे व नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण संस्थामार्फत अनुक्रमे पुणे करीता २०० व नाशिक करीता २०० अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा “दिव्यांग” असलेल्या व्यक्तींसाठी (Person With Disability), ५% जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग,मादगी, ई.) विद्यार्थ्याकरिता आरक्षित असतील, एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येईल.

Barti MPSC पात्रता :-

१) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२) उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा. ३) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

४) उमेदवाराचे वय महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या अटी व शर्ती नुसार असावे.

५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ २४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांस बसणेसाठी पात्र असावा.

६) रु. ८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.

विद्यार्थी निवडीचे निकष:-

> प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने गुणवत्ता यादीतील रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा परीक्षेच्या धर्तीवर असेल.

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :-

१) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १०/०७/२०२३ २) प्रशिक्षण कालावधी १२ महिन्यांचा राहील.

३) पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा दि. ३०/०७/२०२३ रोजी घेण्यात येईल. उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

४) निवड झालेल्यापैकी पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच एकूण

दरमहा ८० टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ९०००/- विद्यावेतन देण्यात येईल. ५) विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ( ऑनलाईन/ऑफलाईन) व विशेष शैक्षणिक साहित्य व पुस्तके यासाठी प्रती विद्यार्थी रक्कम रु.२५०००/- विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

६) प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय/निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही.

७) ज्या उमेदवरांनी यापूर्वी बार्टी पुणे मार्फत (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व UPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यापूर्वी घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही. अधिकार

८) सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व मा.महासंचालक, बार्टी तसेच शासनास राहतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles