आज स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रात नोकर भरतीचे पेपर वारंवार फुटत आहे,करोडोंचा घोटाळा सुरू आहे. TCS/IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये खासगी परीक्षा केंद्र मॅनेज केली जात आहे. यासाठी आज ट्विटर वॉर आयोजित केला होता. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. Talathi Bharti 2022
“मागील सरकारमध्ये जेंव्हा आव्हाड साहेब म्हाडा पेपरफुटीनंतर आपण पारदर्शक फेरपरीक्षा घेऊन दाखविली. आपल्यामुळेच TCS/IBPS सारख्या संस्थांना कंत्राट मिळाले पण आता परत तेच प्रकार घडतं आहेत. त्यामुळे पेपरफुटीवर कठोर कायद्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती | Talathi Bharti
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. आता आगामी होणारी तलाठीच्या परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणात घोटाला होणार असल्याची चर्चा होत आहे. यासाठी आज #परीक्षाकेंद्रफक्तटीसीएस आणि #पेपरफुटीवरकडककायदा अशी मागणी केली आहे.
गेली अनेक वर्ष वारंवार पेपेर फोडून विद्यार्थी अधिकारी बनत आहेत. महापरिक्षा पोर्टल पासून ते अगदी अलीकडे मुंबई पोलिसभरती पर्यन्त सर्व घोटाळे पुरावे देवून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सिद्ध केले आहेत. आता यासाठीच एक कायदा करण्यात यावा ही मागणी करण्यात येत आहे. Talathi Bharti
विविध राज्यातील पेपरफुटी कायदे पुढील प्रमाणे आहेत :
१) राजस्थानच्या नवीन पेपरफुटी कायद्यानुसार नोकरभरती परीक्षा, शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परीक्षेचा समावेश या कायद्यात केला गेला आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या, कॉपीस मदत करणाऱ्याला ५ ते १० वर्षांची शिक्षा, १० लाख ते १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केली गेली आहे. कॉपीस मदत करणाऱ्या टोळीच्या सदस्यांची मालमत्ता जप्त करण्याची तसेच परीक्षार्थीनी नोकर भरतीचा फोडलेला पेपर खरेदी केल्यास त्यांना तीन वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
२) उत्तरप्रदेशात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद असून घोटाळेबाजांची मालमत्ता जप्त करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
३) उत्तराखंड सरकारने स्पर्धा परीक्षेतील घोटाळे थांबवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंड स्पर्धा परीक्षा अध्यादेशाला (भरतीत अनुचित साधनांना प्रतिबंध आणि निवारणाचे उपाय) मंजुरी दिली. यानंतर हा अध्यादेश कायदा बनला. या कायद्यान्वये जर कोणता व्यक्ती, प्रिंटिंग प्रेस, परीक्षा घेणारी कंपनी/संस्था संगठितरीत्या पेपर फोडण्याच्या षडयंत्रात सामील असल्याचे सिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक व्यक्तीला जन्मठेप व दहा कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आहे. तसेच परीक्षा देणारा कोणताही परीक्षार्थी कॉपी/गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा व दहा लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
महाराष्ट्रतील पेपरफुटी घोटाळ्यांसाठी याप्रकारचे कडक कायदे अस्तित्वात नसल्याने निर्ढावलेले घोटाळेबाज एकामागून एक नोकरभरती पेपर फोडत सुटले आहेत. कायद्याचा धाक नसल्याने प्रत्येक नोकरभरतीचे पेपर फोडण्यात येत आहे आणि एक पेपर फोडल्यानंतर ही मंडळी काहीच दिवसात तुरुंगाबाहेर पुढील पेपर फोडण्यास सज्ज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाद्वारे याप्रकारचा कडक पेपरफुटी कायदा मंजूर करून घेणे गरजेचे झाले आहे. पेपर फोडणाऱ्या टोळ्या, घोटाळ्यांसाठी जबाबदार असल्या तरी या टोळ्यांची मदत मिळवून नोकऱ्या प्राप्त करणारे सामान्य उमेदवार सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. म्हणून नवीन कायद्यात घोटाळे करून नोकरी प्राप्त करणाऱ्या सर्वसामान्य उमेदवारांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे व कडक शिक्षा आणि दंड ठोठावण्यात यावा. नोकरभरती घोटाळ्यात सामील असणाऱ्या व्यक्तींना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा, १० करोड रुपयांपर्यंत दंड, मालमत्ता जप्ती आणि कॉपी करणाऱ्या परीक्षार्थीस पाच वर्षाची शिक्षा आणि दहा लाखापर्यंत दंड इत्यादी कडक तरतुदी असलेला पेपरफुटी प्रतिबंधक कायदा महाराष्ट्रात मंजूर करून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती प्रयत्न करत आहे.
Talathi Bharti 2022: Your Gateway to a Successful Career
Are you aspiring to secure a promising career in the government sector in 2022? Talathi Bharti 2022 presents an excellent opportunity for individuals looking to make a significant impact in their professional lives. In this comprehensive guide, we will delve into the details of Talathi Bharti and provide you with all the essential information you need to excel in this highly competitive examination. So, let’s embark on this journey together and unlock the doors to your dream career.
Understanding Talathi Bharti
Talathi Bharti is a prestigious government recruitment process conducted by various state governments in India. The recruitment drive aims to fill vacancies for the position of Talathi, also known as Patwari, in different regions or talukas. Talathis play a vital role in the administration of revenue and land-related matters at the grassroots level.
The Talathi Bharti examination evaluates candidates’ knowledge and expertise in subjects like general knowledge, mathematics, regional language, and current affairs. Successful candidates are appointed as Talathis in respective talukas, serving as intermediaries between the government and the local population.
Key Highlights of Talathi Bharti 2022
1. Online Application Process
To apply for Talathi Bharti 2022, aspiring candidates must keep an eye out for the official notification released by the respective state government. The application process is likely to be conducted online, ensuring a seamless and convenient experience for candidates across the state. Make sure to check the official website regularly for updates and announcements.
2. Eligibility Criteria
Before you start preparing for the Talathi Bharti examination, it’s crucial to understand the eligibility criteria set by the recruiting authorities. Generally, candidates must possess a minimum educational qualification, such as a bachelor’s degree from a recognized university. Additionally, there might be age restrictions and domicile requirements that applicants need to fulfill. Thoroughly review the eligibility conditions and ensure you meet all the necessary criteria before applying.
3. Syllabus and Exam Pattern
To excel in any examination, having a clear understanding of the syllabus and exam pattern is essential. Talathi Bharti 2022 is no exception. The examination is likely to consist of multiple-choice questions covering subjects like general knowledge, mathematics, reasoning, regional language, and current affairs. Aspirants must strategize their preparation to cover all the topics comprehensively.
4. Comprehensive Study Material
Given the level of competition in government examinations, relying on the right study material is crucial. There are numerous books, online resources, and coaching institutes available to assist candidates in their preparation journey. Choose study materials that are comprehensive, up-to-date, and aligned with the Talathi Bharti syllabus. Practice previous years’ question papers to familiarize yourself with the exam pattern and gain confidence.
5. Time Management
The key to excelling in any examination is effective time management. Create a well-structured study plan that allows you to allocate sufficient time to each subject. Regular revision and practice will help you build speed and accuracy, enabling you to tackle the examination confidently.