सध्या लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात जोरदार चालू आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत विधान केलेलं होत. त्यामुळे आता अशी चर्चा चालू आहे की भाजप 26 जागा लढवतील तर शिंदे आणि अजितदादा गट यांच्या वाट्याला 22 जागा जातील. पण अधिकृत असं काहीही भारतीय जनता पार्टी कडून सांगण्यात आलेल नाही. कोल्हापूर मध्ये बिद्री कारखान्याच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील हे आलेले होते. त्यावेळी पुढारी चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोल्हापूरच्या लोकसभेबाबत मोठं विधान केले आहे.
सध्याच्या स्थितीनुसार विद्यमान दोन्ही खासदार हे शिंदे गटाचे असून नियमाप्रमाणे त्यांना जागा सोडावी लागणार आहे. पण जर भाजप आणि शिंदे गट, अजितदादा गट एकत्र बसून चर्चा करू आणि लोकसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूरची सध्या स्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील एक लोकसभा कमळ या चिन्हावर लढवली जाऊ शकते. किंबहुना या मुलाखतीत चंद्रकांतदादांनी तशी शक्यताही वर्तवली आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी याआधीही सांगितले होते की पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचे पालन करू. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेसाठी भाजपची तयारी सुरू असल्याचे दिसून येते.
हातकणंगले लोकसभेचा विचार केला तर सध्याच वातावरण खूप तापलं आहे. मा. खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दरवाढीसाठी केलेल्या आंदोलना मुळे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने मतदारसंघात कुठेही फिरताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी खासदार हरवले आहेत अश्या आशयाचे फलकही ग्रामस्थांनी लावून लक्ष वेधले होते. तर दुसरीकडे आवडे कुटुंबाकडूनही लोकसभेची तयारी चालू असल्याच्या बातम्या चर्चेला येऊ लागल्या आहेत. हातकणंगले लोकसभेसाठी राजू शेट्टी यांना टक्कर द्यायची असेल तर नवीन चेहरा हवा अशी चर्चा होत आहे. त्यातच पुढारीन्युज ला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांतदादांच्या वक्तव्यामुळे हातकणंगले लोकसभा भाजप स्वतः कडे घेऊन तिथे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू शकते का हे पाहावे लागेल.